फिफा वर्ल्ड कपचा सध्या जोरदार फिवर आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेदरम्यानच्या घडामोडी जगभरातील फुटबॉलप्रेमींपर्यंत पोहोचवण्यासाठी याठिकाणी बऱ्याच देशांतील पत्रकारही उपस्थित आहेत. याठिकाणी अर्जेंटीनाहून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या महिला पत्रकाराला ऐन रिपोर्टींग करताना लुटल्याची घटना घडली आहे. डोमनिक मेटझगर नावाची पत्रकार महिला लाईव्ह रिपोर्टींग करण्यात व्यक्त असताना तिची हँडबॅग चोरीला गेल्याचे तिचे म्हणणे आहे. आपली बॅग चोरीला गेली म्हटल्यावर ही महिला पत्रकार पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी गेली. तक्रार दिल्यावर पोलीसांनी तिला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती हैराण झाली (Journalist Reporting On Fifa World Cup Robbed in Front of Live Camera).
महिलेच्या म्हणण्यानुसार, मी तक्रार द्यायला गेल्यावर याठिकाणी सांस्कृतिक वाद सुरू झाले. यावेळी पोलिसांनी तिला आपल्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी असून आपण या चोराचा शोध लावू. मात्र त्याला शोधल्यावर काय करायला हवे असे पोलिसांनीच या महिला पत्रकाराला विचारले, जे ऐकून ती हैराण झाली. पोलिसांनी महिलेला विचारले, की या चोराला आम्ही काही शिक्षा देऊ? की त्याला ५ वर्षांचा तुरुंगवास देऊ की त्याला कैदेत ठेवू? आता काय शिक्षा द्यायची हे ती पत्रकार कसे सांगणार? आपण वार्तांकन करत असताना याठिकाणी आपली बॅग चोरीला गेली या गोष्टीचेही संबंधित महिलेने आपल्या चॅनेलवर वार्तांकन केले.
माझ्या बॅगमध्ये असलेले कार्ड आणि कागदपत्रे ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची असून बाकी गोष्टींचे मला काहीच नाही असेही या पत्रकार महिलेने सांगितले. या स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी शेकडो जणांची नियुक्ती केली आहे. मात्र यातील अनेकांना या कामाचा अनुभव नसल्याने पहिल्या दिवसापासूनच अशाप्रकारच्या चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे फुटबॉलच्या मॅचेसबरोबरच याठिकाणच्या इतर गोष्टींमुळेही ही स्पर्धा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.