Join us  

कोण म्हणतं अतिक्रमण काढा? पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; मारुती कारवरच बनवलं दुकान, लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 3:47 PM

Jugaad for shop man made shop : हा फोटो  सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

एखादी व्यक्ती जेव्हा अडचणीत सापडते आणि समोर काहीच पर्याय नसतो. अशावेळी त्या अडचणीतून  बाहेर येण्यासाठी काहीजण अनोखी शक्कल लढवतात.जुगाड हे भारतीय लोकांच्या सर्वात प्रसिद्ध कौशल्यांपैकी एक आहे. हे एक कौशल्य आहे जे प्रत्येक भारतीयामध्ये रुजलेले आहे. यासाठी कोणताही कोर्स किंवा प्रशिक्षण नाही. समस्येवर उपाय सापडत नाही, तेव्हा लोक जुगाडाने आपली प्रत्येक समस्या सोडवतात आणि आपले काम पूर्ण करतात. (Jugaad for shop man made shop on maruti car roof shop desi man unique jugaad video viral)

नुकतेच एका व्यक्तीनं असा एक जुगाड केलाय जो पाहून सोशल मीडिया युजर्स खूप हसत आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊचे आहे, जिथे या भावाने कारला स्वतःचे दुकान बनवले आहे. त्यांनी मारुती 800 चे छत कापून स्वतःचा छोटा मजला बनवला आहे. ज्याला पाहून जनता म्हणत आहे की हे तंत्रज्ञान देशाबाहेर जाऊ नये.

हा फोटो  सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हे आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी ट्विटरवर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे - हे खूपच नाविन्यपूर्ण आहे. फेसबुक यूजर प्रवीणनेही फोटो शेअर करत लिहिले,

रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा चविष्ट टोमॅटो पुलाव, ही घ्या झटपट रेसेपी

भारतीय जुगाड, अतिक्रमणाची भीती नाही, जागेचे टेन्शन नाही.  आता युजर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी याला फिरते पान शॉप म्हटले. आणि असा जुगाड यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचं काही लोक सांगत आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल