94 व्या एकेडमी अवॉर्ड्स/ ऑस्कर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्वार्ड फंक्शननंतर द वॅनिटी फेअर २०२२ अफ्टर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टिमध्ये एकापेक्षा एक डिजायनर आऊटफिट्समध्ये सेलिब्रिटी झळकले. या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अभिनेत्री ज्युलिया फॉक्सनं. तिचा आगळा वेगळा लूक आणि हातातली खास बनावटीची पर्स लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सोशल मीडियावरही तिच्या पर्सचे फोटो व्हायरल झाले असून या पर्सची नक्की खासियत काय यावर चर्चा रंगली आहे. (Julia Fox Wore a ‘Human Hair’ Clutch at the Oscars 2022 After-Party)
ज्युलियानं काळा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. फ्लोर स्वीपिंग, फुल लेदर ड्रेस Han Kjobenhavn च्या स्प्रिंग कलेक्शन २०२२ मधला आहे. या ड्रेसला साजेसा मेकअप असावा यासाठी ज्युलियाने सिग्नेचर चॉक ब्लॅक आयलायनर लावलं होतं. तिनं हातात लांब केसांची पर्स घेतली होती. ज्युलियाची ही काळी पर्स मानवी केसांनी तयार करण्यात आली होती. Kjobenhavn ने सांगितल्यानुसार, हा ड्रेस सेरामिक आर्टिस्ट Naomi Gilon च्या सहकार्याने बनवण्यात आला. गळ्याभोवती असलेल्या स्केलेटन हँडने ड्रेसला एक वेगळाच लुक दिला आहे.
एका मुलाखतीत ज्युलियानं सांगितले की, डोळ्यांचा मेकअप तिनं स्वतः केला होता. आउटफिटबद्दल ती फारसं बोलली नसली तरी तिने घेतलेली पर्सही मानवी केसांपासून बनवलेली असल्याचं तिने नमुद केलं. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना ज्युलियाने लिहिले की, 'कुठून सुरू करू... Han Kjobenhavn माझ्या फॅशनसाठी मनापासून आभार आणि वॅनिटी फेअर मला पुन्हा एकदा बोलावल्याबद्दल तुमचेही आभार.'