टिचर्स डे म्हणजेच शिक्षक दिन नुकताच पार पडला. यावेळी काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कोणी त्यांच्या शाळेच्या आठवणी सांगितल्या. पण अभिनेत्री काजोल हिने मात्र "To my biggest mentor....." असं म्हणत एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे (viral video of Kajol). या व्हिडिओद्वारे तिने शिक्षकदिनानिमित्त तिला घडविणाऱ्या तिच्या आयुष्यातील ३ व्यक्तींचा उल्लेख केला आहे. त्या तीन व्यक्तींपैकी पहिली आहे तिची आई- म्हणजेच अभिनेत्री तनुजा. दुसरी आहे तिची आजी म्हणजेच अभिनेत्री शोभना समर्थ तर तिसरी आहे तिची पणजी.(Kajol celebrate Teacher's day by giving wishes to her mother Tanuja)
काजोलने आजवर अनेक मुलाखतींमधून तिच्या आईचा, आजीचा, पणजीचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविषयी ती जे काही बोलली त्याचे अनेक लहान- मोठे तुकडे एकत्र करून तिने हा व्हिडिओ बनवला आहे.
सणासुदीला पदार्थ तळताना कमी तेल लागावे म्हणून ३ उपाय, कमी तेलातही होतील उत्तम पदार्थ
यामध्ये ती तिच्या आईविषयी सांगते की माझी आई एक स्ट्रॉंग कूल वुमन होती. ती आम्हाला नेहमी म्हणायची की तु पडलीस तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पण पडल्यानंतरचं तुझं दु:ख, तुझ्या जखमा तुलाच सोसाव्या लागणार आहेत. शाळेत माझी आई मला घ्यायला कधीच यायची नाही. याचं मला वाईट वाटायचं. त्यावेळी ती सांगायची की मला तुझ्याजवळ बसायला, तुला घ्यायला यायला खूप आवडलं असतं. पण मला काम करणं खूप गरजेचं आहे....
काजोल पुढे म्हणते की माझी आई तर 'ऑसम' आहेच, त्यासोबतच तिची आई 'फॅब्यूलस' होती, तिची आई 'अमेझिंग' होती. त्या तिघींकडून मी नेहमी कोणत्या ना कोणत्या उदाहरणातून शिकत गेले.
वयाच्या चाळीशीत ट्विंकल खन्ना पुन्हा कॉलेजात, मास्टर्स पूर्ण करत म्हणाली, सोपे नव्हते काही कारण...
त्या तिघींनीही मला अशा काही गोष्टी शिकविल्या ज्या कधीच शाळेत शिकवल्या जात नाहीत. कारण त्यांनी शिकवलेले सगळे धडे आयुष्याशी निगडीत आहेत, आणि जेव्हा केव्हा मला त्यांची खूप गरज असते, ते माझ्या जवळच असतात. त्या मला जे काही सांगायच्या ते मी नुसतं ऐकायचे नाही. माझ्यात रुजवून घ्यायचे... म्हणूनच तर the current me who is a beautiful amalgamation of everything I was taught and continue to be taught. असं म्हणत काजोलने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.