Join us

करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 16:59 IST

Kangana Ranaut goes vocal for local as she flaunts Rs 600 saree, says, ‘style is not slave...’ कंगणा रनौत कायमच चर्चेत असते, दिसते सुंदर आणि तिच्या फक्त ६०० रुपयांच्या साडीचीही चर्चा होतेच.

कंगणा रनौत. आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत असते.अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकली आहे. ''हिमाचल की राणी'' म्हणून ओळखली जाणारी कंगणा ३६ वर्षांची झाली. तिने हिंदी सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहे. १८ वर्षांच्या कारकिर्दीत तिने अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास केला.

राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार तिला मिळाले. ती फिल्म इंडस्ट्रीतील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सीए नॉलेजमधील माहितीनुसार, कंगणाची एकूण संपत्ती १३ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. मात्र कंगणाचे फॅशन स्टेटमेंट नेहमी हटके असते. तिचा असाच एक लूक सोशल मीडियात व्हायरल झाला होता. ज्यात तिने चक्क ६०० रुपयांची साडी नेसलेली होती(Kangana Ranaut goes vocal for local as she flaunts Rs 600 saree, says, ‘style is not slave...’).

जिद्द असेल तर काय अशक्य आहे? स्मृती इराणी सांगतात, हिमतीने जगण्याची गोष्ट..

६०० रुपयांची कंगनाची साडी

कंगणाचा एअरपोर्ट लूक हा बहुतांशवेळा साडीतच असतो. एकदा कंगणाने इंस्टाग्रामवर पावडर ब्लू कलरच्या साडीत एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सांगितले की तिच्या साडीची किंमत फक्त ६०० रुपये आहे, जी तिने कोलकाता येथून खरेदी केली होती. ही पोस्ट शेअर करताना कंगणा म्हणाली की, ''स्टाईल ही आंतरराष्ट्रीय ब्रँडची गुलाम नाही.''

कंगणाच्या या पोस्टचे सर्वांनी कौतुक तर केलेच, पण तिची ही साधी साडीही अनेकांच्या पसंतीस उतरली. ब्ल्यू कलरच्या या साध्या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर आहे, यात तिने हाय नेक ब्लाउज परिधान केला आहे. यासह सनग्लासेस, काळे बूट आणि लक्झरी हँडबॅगने तिने हा लूक पूर्ण केला. 

टॅग्स :कंगना राणौतसाडी नेसणेबॉलिवूड