Join us  

खात्यात फक्त ३००० रुपये होते, पोटासाठी काम केलं कारण..कान्समध्ये पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री कानी कुसरुती सांगते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 1:58 PM

Kani Kusruti breaks down recalling financial struggles : आर्थिक झळ बसू नये; उदरनिर्वाहासाठी कानीने 'बिर्याणी' चित्रपटात काम केलं; या चित्रपटासाठी तिला..

शून्यातून जग निर्माण करणारे अनेक कलाकार आपण पाहिले असतील (Cannes Film Festival). खिशात पैसे नसताना अनेकांनी टॅलेण्टच्या जोरावर नाव कमावलं आहे. केरळमध्ये जन्मलेल्या अभिनेत्रीचा देखील यात समावेश आहे. कानी कुसरुती सध्या पायल कपाडिया दिग्दर्शित'ऑल वी इमेजिन एज लाइट' या चित्रपटासाठी चर्चेत आहे (Financial Struggles).

या चित्रपटात तिने 'प्रभा' ही व्यक्तीरेखा साकरली. तिला नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हलकडून ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला असून, तिने आपल्या पुरस्काराबाबत आनंद तर व्यक्त केलाच आहे. पण सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी तिला आर्थिक संघर्षांचा सामना कसा करावा लागला? हे मुलाखतींद्वारे आठवणींना उजाळा दिला आहे(Kani Kusruti breaks down recalling financial struggles).

बँक खात्यात होते फक्त ३००० रूपये आणि..

एशियानेट न्यूजला मुलाखत देताना कानी म्हणते, 'मी जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते तेव्हाच मला शांती मिळते. बऱ्याचदा अशाही काही चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. त्यात मी व्यक्तिरेखा नसून, उदरनिर्वाहाचा आधी विचार केला आहे.'

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल

साजिन बाबू दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'बिर्याणी' या चित्रपटाबद्दल तिने अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात साकारलेल्या भुमिकेमुळे, तिला केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

दिग्दर्शक साजीन यांनी चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर, कानीने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. याबाबत कानी सांगते, 'माझ्याकडे पैसे नसताना, साजीनने 'बिर्याणी' हा चित्रपट मला ऑफर केला होता. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असे वाटले, मी ही भूमिका साकारू शकणार नाही. तेव्हा मी त्याला दुसरी अभिनेत्री शोधण्यास सांगितले.'

ती पुढे म्हणते, 'त्यावेळी पैश्यांची गरज होती. त्याने मला ७०,००० रुपयांची ऑफर दिली. माझ्यासाठी ती खूप मोठी रक्कम होती. माझ्या खात्यात फक्त ३००० रुपये शिल्लक होते. त्यामुळे या चित्रपटामध्ये काम करण्यास मी होकार दिला.'

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स आले, तुमचं पोट तर बिघडलेलं नाही? पाहा पिंपल्स येण्याची ३ कारणं..

याबाबत कानीचे पालक म्हणाले, 'नाटकातून कानीची कमाई झाली असती तर, कदाचित तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं नसतं.' त्यामुळे कानीचा कशा पद्धतीने सिनेसृष्टीत प्रवेश झाला. तिने कलेच्या जोरावर कसं सगळं साध्य केलं, आणि कान्ससारख्या व्यासपीठावर जाऊन पुरस्कार पटकावला; या सगळ्या गोष्टी एखाद्याला प्रेरणा देणाऱ्या ठरत आहेत. 

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलसोशल व्हायरल