Lokmat Sakhi >Social Viral > Root Canal : भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?

Root Canal : भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?

Root Canal : तिचा हा फोटो पाहून अनेकांना रूट कॅनलबद्दल भिती वाटत आहे. जाणून घेऊया तिची ही अवस्था कशामुळे झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:54 PM2022-06-22T13:54:15+5:302022-06-22T14:03:03+5:30

Root Canal : तिचा हा फोटो पाहून अनेकांना रूट कॅनलबद्दल भिती वाटत आहे. जाणून घेऊया तिची ही अवस्था कशामुळे झाली.

Kannada actress swathi sathish suffering from face inflammation after root canal surgery know what is rootcanal and side effects | Root Canal : भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?

Root Canal : भयंकर! रूट कॅनल नंतर बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; खरंच ही ट्रिटमेंट इतकी धोकादायक असते?

शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच दातांची दुखणी खुपणीही सुरू असतात. दरम्यान एका अभिनेत्रीला दातांची ट्रिटमेंट चांगलीच महागात पडली आहे.(Viral Photo) डिजिटल निर्माता विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा एक फोटो शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, या पोस्टद्वारे तिने सांगितले आहे की अभिनेत्रीचं नुकताच रूट कॅनल झालं आहे जे चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे आणि त्यानंतर तिचे तोंड सुजले आहे. (Kannada actress swathi sathish suffering from face inflammation after root canal surgery know what is rootcanal and side effects)

व्हायरल भयानी यांनी स्वातीचे दोन फोटो अपलोड केले आहेत, ज्यात तुम्ही पाहू शकता की एका फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत तिचा चेहरा रूट कॅनालनंतर सुजलेला आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांना रूट कॅनलबद्दल भिती वाटत आहे. जाणून घेऊया तिची ही अवस्था कशामुळे झाली.

रुट कॅनल काय आहे?

रूट कॅनल उपचारांना एंडोडोन्टिक उपचार असेही म्हणतात. जेव्हा दाताच्या आतील भागाला संसर्ग किंवा सूज येते तेव्हा या उपचारांची आवश्यकता असते. खरं तर, हा भाग रक्तवाहिन्या, नसा आणि जिवंत संयोजी ऊतक असलेला भाग आहे.  खराब झालेले किंवा संक्रमित दात काढून टाकण्याऐवजी ते ठेण्यासाठी रूट कॅनल ट्रीटमेंट वापरली जाते.

रूट कॅनलनंतर काय होतं?

अमेरिकन असोसिएशन ऑफ एंडोडोन्टिस्ट्सच्या मते, रूट कॅनाल नंतर पहिल्या काही दिवसांत, काही रुग्णांना संवेदनशीलता, सूज किंवा वेदना जाणवू शकतात. एन्डोडोन्टिस्टने दिलेल्या औषधांवर काही लोकांची प्रतिक्रिया असू शकते. या उपचारानंतर कोणतीही लक्षणे जाणवत असोत किंवा नसोत, तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या कारणांमुळे रूट कॅनर फेल होऊ शकतं

केवळ रूट कॅनलच नाही तर कोणतीही शस्त्रक्रिया यशस्वी होतेच असे नाही. स्वातीच्या बाबतीतही असेच झाले. तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि नंतर तिना सूज येण्यासारख्या गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला. तसे, वैद्यकीय क्षेत्रात ही शस्त्रक्रिया अयशस्वी होण्याची अनेक कारणे आहेत जसे की- उपचार सुरू करण्यापूर्वी किंवा उपचारादरम्यान कॅनल साफ न करणे, क्राऊन किंवा इंटरनल सीलेंट तुटणे. रूट कॅनलवर उपचार घेतलेले दात मुळापासून संक्रमित होतात आणि इतर दातांवर परिणाम करतात.

रूट कॅनलनंतर सूज येण्याची शक्यता किती असते?

असे मानले जाते की रूट कॅनल नंतर, हिरड्यांमध्ये किरकोळ जळजळ होऊ शकते. कारण वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन्स दिली जातात. उपचारानंतर तुम्हाला तुमच्या हिरड्या, जबडा किंवा तोंडाच्या बाजूला सूज किंवा वेदना होत असल्यास, हे रूट कॅनलमध्ये काहीतरी चुकीचे असल्याचे लक्षण असू शकते. सुजलेल्या हिरड्या संसर्ग पसरवू शकतात. बॅक्टेरिया अजूनही तुटलेल्या, नीट  साफ न केलेल्या रूट कॅनलच्या मुळांमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्याच्या सभोवतालच्या ऊतींवर परिणाम करू शकतात.
 

Web Title: Kannada actress swathi sathish suffering from face inflammation after root canal surgery know what is rootcanal and side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.