१९९० च्या आसपास करिश्मा कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. कपूर कुटूंब बॉलीवूडमध्ये मुरलेलं होतं. तरी पण त्या घराण्यातल्या मुली तोपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या नव्हत्या. करिश्मा कपूर ही अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी पहिलीच कपूर कन्या. त्यामुळे तिच्याकडे, तिच्या करिअरकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं. या नवख्या जगात प्रवेश करताना आई बबिता मात्र कायम तिच्यासोबत होती, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली होती. त्यामुळेच तर करिश्माच्या करिअरचा बॅकबोनच आई बबिता ठरली... असं मत अभिनेत्री करिना कपूर हिने व्यक्त केलं आहे. (Kareena Kapoor explains how mother Babita help Karisma Kapoor)
Mid-Day ला मुलाखत देताना करिनाने तिच्या स्वत:च्या, करिश्मा कपूरच्या आणि बबिता यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या. ती म्हणते की १९९० हा काळच असा होता की त्या काळात अनेक अभिनेत्रींच्या सोबत त्यांच्या आई असायच्या स्टार मदर असा तो काळ होता.
गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्यापिण्याची ही ३ पथ्यं पाळा, मग नाचा बिनधास्त रात्रभर
त्यामुळे माझी आईही कायम करिश्मासाेबत असायची. चित्रीकरणादरम्यान ती सोबत असायची. चित्रपटांची निवड ठरविण्यासाठी, अमूक एखादा चित्रपट करिश्माला मिळावा म्हणून नेहमीच आई प्रयत्नशील असायची. त्यामुळे करिश्माच्या करिअरला एक आकार देण्याचे सगळे श्रेय आईलाच जाते. तिने करिश्माला तिच्या करिअरसाठी एखाद्या वाघिनीप्रमाणे साथ दिली. पण माझ्यावेळी मात्र तिची भूमिका पुर्णपणे बदलली होती. यामागचं कारणही करिनाने सांगितलं आहे.
करिना म्हणते की मी २००० च्या आसपास काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मी करिश्माच्या तुलनेत खूप जास्त इंडिपेंडंट झाले होते. माझे निर्णय मला घेता यायचे, माझं मला ठरवता यायचं.
गरबासाठी करा खास हेअरस्टाईल, बघा ७ ट्रेण्डी- स्टायलिश पर्याय, गरबा खेळताना चारचौघीत उठून दिसाल
कारण तो आत्मविश्वास आईनेच माझ्यामध्ये निर्माण केला होता. शिवाय तो स्टार मदर काळही माझ्या करिअरच्या सुरुवातीला राहिला नव्हता. वडील रणधीर कपूर यांच्याबाबत करिना म्हणते की त्यांनीही तिच्या आणि करिश्माच्या करिअरला नेहमीच खूप प्रेरणा दिली.