गुढीपाडवा, रमजान ईद असे दोन मोठे सण नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे झाले. सर्वसामान्य लोकांना या सणांचा जसा उत्साह असतो, तसाच तो सेलिब्रिटींनाही असतोच.. सण साजरा करून सेलिब्रिटी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात आणि त्यानंतर मग त्यांच्या चाहत्यांमध्ये त्या फोटोंविषयीच्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागतात. एखादा फोटो खूपच भाव खाऊन जातो तर एखाद्या फोटोवर सपाटून टिका केली जाते. सध्या एका फोटोचं तसंच झालं आहे. पतौडी कुटूंबियांमध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी झाली. सोहा अली खान (Soha Ali Khan) हिने तिचे शीरखुर्मा तयार करण्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले (Eid Celebration). त्यासोबतच तिने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यामुळे मात्र तिची वहिनी म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर थेट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे....
करिना कपूर का ट्रोल होते आहे?
नणंदबाईंनी शेअर केलेल्या फोटोंमुळे वहिनी का ट्रोल होते आहे, हा फोटो करिनाच्या चाहत्यांना पडणं साहजिक आहे. या फोटोमध्ये सोहा अली खान, तिचा नवरा कुणाल खेमू, सैफ अली खान, करिना कपूर आणि सबा पतौडी असे सगळे दिसत आहेत.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी नारळपाणी प्यायलं तर चालतं का? बघा तज्ज्ञ काय सांगतात
आता कोणताही सण म्हटलं की महिला हमखास नटून- थटून छान तयार होतात. तसंच ईदनिमित्त सोहा आणि सबा या दोघी बहिणीही छान नटून तयार झाल्या आहेत. पण करिना मात्र नो मेकअप लूकमध्ये आहे. तिने अजिबात मेकअप केलेला नाही. शिवाय केसांनाही तेल चोपडून त्याचा अंबाडा घातल्याप्रमाणे ती दिसते आहे. त्यामुळे तिच्यावर तिचे चाहते सपाटून टिका करत आहेत..
तिने नेहमीच का नटावं?
काही जण करिनाला ट्रोल करत असताना तिचे चाहते मात्र तिची बाजू उचलून धरत आहेत. करिना बऱ्याचदा नो मेकअप लूकमध्ये असते आणि तो लूकही तिला छान दिसतो.. असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
उपवासाच्या साबुदाणा- बटाटा चकल्या करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी- गॅस पेटविण्याचीही गरज नाही...
शिवाय या फोटोमध्ये करिनाने जो ड्रेस घातला आहे तो काही साधासुधा नसून चांगला महागडा आहे. सुकेत धीर यांनी तो ड्रेस डिझाईन केला असून तो मुगा सॅटीन सिल्क प्रकारातला आहे. या ड्रेसची किंमत २८ हजार रुपये असून त्याच्यावरची ओढणी चंदेरी सिल्कमधली आहे. या ओढणीची किंमतही १८ हजारांपेक्षा जास्त आहे. आता एवढा महागडा ड्रेस घालूनही करिना नटली नाही असं कसं म्हणता येईल असं तिचे चाहते म्हणत आहेत...