Join us  

‘त्याच्या’ प्रेमात झाले होते दिवानी, आईने बोर्डिगला केली रवानगी!- करीना कपूर सांगते एकेकाळचा वेडेपणा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 5:25 PM

Kareena Kapoor reveals mom Babita sent her off to boarding school after she broke a lock, snuck out to meet a boy : वयात येतानाचा वेडेपणा आणि आईची शिस्त याविषयी सांगतेय करीना कपूर

बोल्ड अँड ब्यूटीफुल बेबो अर्थात करीना कपूर (Kareena Kapoor) आपल्या अदाकारी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिने आजतागायत अनेक चित्रपटांमध्ये काम करून, आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांसमोर पाडली आहे. बेबोने २ दशकाहून अधिक काळ गाजवलाय (Bollywood Gossips). ती आपल्या एक्स्प्रेशनने समोरच्या व्यक्तीला घायाळ करते. एकेकाळी करीना खूप खोडकर असल्याचं ती सांगते.

शिवाय एका मुलाला भेटण्याच्या नादात ती अडचणीत आल्याचंही ती सांगते. या खोडकर स्वभावाला कंटाळून आई बबिताने (Actress Babita) तिला देहरादूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं होतं (Social Viral). किशोरवयात बेबोने नक्की असं काय केलं होतं? आई बबिता करीनाला एवढी काय वैतागली होती? 'त्या' मुलासाठी बेबो घरातून का पळून गेली होती? पाहूयात(Kareena Kapoor reveals mom Babita sent her off to boarding school after she broke a lock, snuck out to meet a boy).

लग्नाची वरात प्रायव्हेट जेटच्या दारात! पाहा आगळ्या वेगळ्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ; सात फेरे घेतले थेट आकाशात..

एका मुलासाठी बेबोने सोडले होते घर..

आपल्या किशोर वयातील खोडकर चुकांना उजाळा देत, बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणते, 'लहानपणापासून लोलो (करिश्मा कपूर) जे करायची, तेच मी देखील करायची. करिश्माला तिच्या मित्रांसोबत बाहेर फिरण्याची परवानगी होती, पण मला नव्हती. याचा मला खूप राग यायचा. मी १४ - १५ वर्षांची असेन, तेव्हा मला एक मुलगा फार आवडायचा. पण आईला ती गोष्ट खटकली. आईवर एकल मातृत्वाची जबाबदारी असल्याने तिला माझी खूप काळजी होती. त्याला मला भेटायचे होते. पण आईने साहजिकच त्यावेळेस नाकारले होते.

परी म्हणू की अप्सरा! सारा अली खानची सोनसळी पिवळी साडी, पाहा गोव्यातली खास अदा

मी त्याच्यासोबत फोनद्वारे बोलायची, भेटायची. पण माझ्या या सवयींना वैतागून तिने तिच्या रूममध्ये माझा फोन लॉक करून ठेवला होता. एकेदिवशी आई बाहेर डिनर करायला गेली असता, त्या मुलाला भेटण्यासाठी मी युक्ती लढवली. ज्या रुममध्ये आईने फोन ठेवला होता, मी त्या रुमचं कुलूप तोडलं. त्या मुलाला फोन करून भेटण्याचा प्लॅन केला आणि घरातून गुपचूप पळून गेले. आईला जेव्हा हे प्रकरण कळले, तेव्हा तिने माझे काही न ऐकता, मला देहरादूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये धाडले.'

टॅग्स :करिना कपूरसोशल मीडियासोशल व्हायरलबॉलिवूड