Lokmat Sakhi >Social Viral > करीना कपूरही नाश्त्याच्या पदार्थांना बटर चोपडून खाते! आणि तरी कशी काय राखते झिरो फिगर...

करीना कपूरही नाश्त्याच्या पदार्थांना बटर चोपडून खाते! आणि तरी कशी काय राखते झिरो फिगर...

Kareena Kapoor Talks About The Importance Of Butter In Breakfast : करीना कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सांगितले बटर खाण्याचे सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 06:36 PM2024-10-21T18:36:49+5:302024-10-21T18:46:01+5:30

Kareena Kapoor Talks About The Importance Of Butter In Breakfast : करीना कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सांगितले बटर खाण्याचे सिक्रेट...

Kareena Kapoor Talks About The Importance Of Butter In Breakfast | करीना कपूरही नाश्त्याच्या पदार्थांना बटर चोपडून खाते! आणि तरी कशी काय राखते झिरो फिगर...

करीना कपूरही नाश्त्याच्या पदार्थांना बटर चोपडून खाते! आणि तरी कशी काय राखते झिरो फिगर...

सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आपल्याला ब्रेड बटर खायला सगळ्यांनाच आवडत. पण बटर खाल्ल्याने वजन वाढते म्हणून काहीजण बटर खायला नकोच म्हणतात. बटर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. बटर घालून किंवा बटर लावून केलेला कोणताही पदार्थ खायला मस्त लागतो. पण म्हणून डेअरी बटर रोज खाणं योग्य नाही. ते रोज खाऊ नका असं म्हटलं जातं. बटर खाल्ल्याने आपण जाड होऊ वजन वाढेल या भीतीने आपण बटर खाणे कमी करतो, किंवा खातच नाही.

बटरच्या बाबतीत हा समज - गैरसमज असला तरीही, झिरो फिगरसाठी सुप्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) चक्क सकाळच्या नाश्त्यात बटर खाण्याचा सल्ला देतेय. झिरो फिगर आणि खाण्याच्या बाबतीत अतिशय फूडी पण तितकीच फिटनेसच्या बाबतीत अगदी काटेकोर असलेली करीना सकाळी नाश्त्यात बटर खाते. करीना अनेकदा सोशल मिडीयावर खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. नुकतेच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर सकाळच्या ब्रेकफास्टचा एक फोटो शेअर करत, नाश्त्यामध्ये बटर खावे यावर अधिक भर दिला आहे(Kareena Kapoor Talks About The Importance Of Butter In Breakfast).

करीनाने ब्रेकफास्टचा फोटो केला शेअर...  

करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोन प्लेट्सचा फोटो शेअर केला आहे. करीनाने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, “ब्रेकफास्टमध्ये बटर असणे खूप महत्वाचे आहे.” फोटोमध्ये एका लहान मुलाचा हात देखील दिसतो, शक्यतो तिच्या मुलाचा, तैमूर अली खान किंवा जहांगीर अली खानचा असण्याची शक्यता आहे. करीनाने अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या मुलांचे उरलेले अन्न खाण्याबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत. 

'हे' ३ पदार्थ खा आणि स्किन प्रॉब्लेम्स कायमचे विसरा, ऋजुता दिवेकर यांचा खास सल्ला...

दिवाळी: पोटभर मिठाई खाल्ली तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स -मन मारायची गरजच नाही...

सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये बटर खाण्याचे फायदे :- 

१. उर्जेचा उत्तम स्रोत :- बटरमध्ये भरपूर प्रमाणात चांगले फॅट्स असतात, जे शरीराला त्वरीत ऊर्जा देण्यास मदत करतात. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये बटर  खाल्ल्याने दिवसभर उर्जेची पातळी टिकवून ठेवता येते.

२. पोषक तत्वांचा स्रोत :- बटरमध्ये व्हिटॅमिन 'ए', 'डी', 'इ'  आणि 'के'  यांसारखे जीवनसत्त्व असतात, जे हाडे, त्वचा आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त असतात.

३. पचन सुधारते :- बटर पचनक्रियेचे कार्य सुधारण्यास मदत करते. बटरमध्ये असणारे बुटिरिक अ‍ॅसिड पाचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

४. मेंदूचे कार्य सुधारते :- बटरमधील फॅटी अ‍ॅसिड मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात, त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत मिळते.

Web Title: Kareena Kapoor Talks About The Importance Of Butter In Breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.