सणवाराच्या निमित्ताने छान तयार झाल्यावर आपल्या स्वत:चा, कुटूंबासोबत, मुलांसोबत एक छानसा फोटो काढावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. आणि त्यात गैर काहीच नाही. फक्त आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनाच नाही, तर सेलिब्रिटींचीही तशीच इच्छा असते. करिना कपूरलाही दिवाळसणाच्या (Kareena Kapoor's Diwali Celebration) निमित्ताने सुंदर तयार झाल्यावर कुटूंबासोबत एक छानसा फॅमिली फोटो काढायचा होता. पण तुमच्या आमच्या घरात लहान मुलं असल्यावर जे होतं, तेच तिच्याघरीही झालं आणि तिच्या मनासारखा परफेक्ट फोटो काढण्यासाठी तिला बिचारीला खूपच झगडावं लागलं. शेवटी मग तिने तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच सैफ अली खानसाेबत फोटो काढला आणि त्यावरच समाधान मानलं. (Kareena Kapoor's struggle for the perfect family picture in diwali)
लहान मुलं सर्वसामान्य लोकांची असो किंवा मग सेलिब्रिटींची असो.. ती सगळीकडे सारखीच असतात. आपल्या घरात कसं लहान मुलं खेळण्या- बागडण्यात दंग असतात, त्यांना फोटोशी फार काही देणं घेणं नसतं.
वापरून झालेले व्हॅक्स कॅण्डल फेकून देऊ नका... घर सजविण्यासाठी त्याचा 'असा' मस्त उपयोग करा
मोठ्यांनी बळजबरी धरून उभं केलं की ते बिचारे कसंनुसं हसतात आणि फोटोसाठी पोझ देतात. त्यांनी साथ दिली तर त्यांच्यासोबत आपल्याला छानसा फोटो काढता येतो. तसंच काहीसं करिनाच्या मुलांचंही आहे. याच विषयीची पोस्ट तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पहिल्या पोस्टमध्ये तिने अनेक फोटो टाकले आहेत. पण नेमकं एकाही फोटोमध्ये तिची मुलं शांत उभं राहिलेली नाहीत.
"Year after year and still trying to get the perfect family picture …❤️ But nonetheless…" अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे. त्यानंतर तिने दुसरी एक पोस्ट शेअर केली आहे, ती पण खूप मजेशीर आहे.
त्यापोस्टमध्ये दारासमोर काढलेली छानशी रांगोळी तिचा धाकटा मुलगा जहांगीर याने मोडून टाकली आहे आणि तो रंगांशी खेळत बसला आहे. "Aiyoooo when the family decides to do Rangoli…or Holi…no idea …but what matters is we had fun…❤️" अशी मजेशीर कॅप्शन तिने त्या फोटोंना दिली आहे.