Join us  

३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी आईबाबा आता शोधताहेत नवरा, लग्नाचं हे काय भलतंच प्रकरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 4:58 PM

Karnataka family looks for groom for daughter who died 30 years ago: ‘Marriage of spirits’ : मृत मुलीच्या लग्नाचा घाट? पण का?

आपल्या देशात लग्नाला अधिक महत्व आहे (Social Viral). लग्न म्हणजे एक पवित्र सोहळा. लग्नामध्ये २ जण पुढचे आयुष्य  एकत्र घालवण्याच्या शपथा घेतात. विवाहादरम्यान, दोन व्यक्ती तसेच दोन कुटुंब एकत्र येतात. पण आपण कधी मृत व्यक्तीचं लग्न लावून दिलेलं पाहिलं आहे का? ऐकून शॉक बसला ना? (Marriage of Spirits)

आपण अनेक चित्रपटात भूतांचं लग्न लावून दिलेलं पाहिलं असेल. पण भारतातील अशा अनेक ठिकाणात अजूनही मृत्यूनंतर लग्न लावण्याची प्रथा प्रचलित आहे, आणि अशीच एक घटना कर्नाटकातून समोर येत आहे. जिथे मृत मुलीसाठी वर शोधत असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे(Karnataka family looks for groom for daughter who died 30 years ago: ‘Marriage of spirits’).

मृत मुलीच्या लग्नाचा घाट? पण का?

हे प्रकरण दक्षिण कन्नड भागातील आहे. ३० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या मुलीसाठी वर शोधणारी वृत्तपत्रातील जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दक्षिण कर्नाटकच्या पुत्तूर येथील एका कुटुंबियांनी त्यांच्या मृत मुलीच्या लग्नाची तयारी सुरु केली असून, फक्त वराच्या शोधात हे कुटुंब आहे.

जेवणानंतर पोट फुग्यासारखं टम्म फुगतं? न ५ गोष्टी खा, अपचनाचा त्रास होणारच नाही

तीस वर्षांपूर्वी तुलूमधील कुटुंबाने लहान वयातच आपली मुलगी गमावली. त्यानंतर घरावर अनेक संकटे ओढावली असल्याचा दावा त्यांनी केला. एक प्रकारे मृत झालेल्या मुलीच्या अनेक इच्छा अपूर्ण असल्याकारणाने, कुटुबियांना त्रास होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यावर तोडगा म्हणून, मृत मुलीचे लग्न, ३० वर्षापूर्वी मरण पावलेल्या मुलाशी लावण्याचे या कुटुंबीयांनी ठरवलं.

जाहिरातीत नेमकं काय?

प्रथा जरी आगळी वेगळी असली तरी, जाहिरात ही अधिक लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये, '३० वर्षापूर्वी निधन झालेल्या वराचा आम्ही शोध घेत आहोत. तशी माहिती आपल्याकडे असल्यास त्वरित कळवावे.' अशा आशयाची जाहिरात सध्या व्हायरल होत आहे.

प्रेशर कूकरमध्ये डाळ-भात शिजवणं योग्य की अयोग्य? ICMR सांगते, प्रेशर कूकर वापरत असाल तर..

नक्की प्रथा काय?

कर्नाटकात प्रीथा मदुवे (आत्म्यांचे लग्न) नावाची परंपरा आहे. तुलुवा समाजातील मान्यतांनुसार, मृत लोक त्यांच्या कुटुंबियांशी जोडलेले असतात. ते त्यांच्या सुख - दुखात सहभागी होतात. त्यामुळे वैकुंठ समर्धने आणि पिंडदान यांसारखे विधी मृत आत्म्यांसाठी अन्नदान आणि विवाह आयोजित केले जातात. 

टॅग्स :कर्नाटकसोशल व्हायरलअध्यात्मिक