Lokmat Sakhi >Social Viral > आई आणि मुलाची कमाल, आई झाली पीएचडी तर मुलगा एमटेक, वाचा त्यांची गोष्ट

आई आणि मुलाची कमाल, आई झाली पीएचडी तर मुलगा एमटेक, वाचा त्यांची गोष्ट

Karnataka: Mother-son duo receives degrees together : आईने पीएचडी तर, मुलाने एम टेक पदवीचं शिक्षण पूर्ण केलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 08:30 PM2024-07-09T20:30:01+5:302024-07-09T20:31:10+5:30

Karnataka: Mother-son duo receives degrees together : आईने पीएचडी तर, मुलाने एम टेक पदवीचं शिक्षण पूर्ण केलं..

Karnataka: Mother-son duo receives degrees together | आई आणि मुलाची कमाल, आई झाली पीएचडी तर मुलगा एमटेक, वाचा त्यांची गोष्ट

आई आणि मुलाची कमाल, आई झाली पीएचडी तर मुलगा एमटेक, वाचा त्यांची गोष्ट

मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आई वडील बऱ्याच गोष्टी करतात (Mother-Son). आई - वडिलांसाठी मुलाच्या यशापुढे काहीच मोठं नसू शकतं. मुलाच्या शिक्षणामागे आईचा देखील मोठा वाटा असतो (Degree). मुलांना देखील आपल्या आईने स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा असते. काही पालक जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली आपली स्वप्नं मारतात. लग्न झाल्यानंतर काही महिलांचे शिक्षण अर्धवट राहते. जॉब करतात, पण संसारामध्ये गुंतून गेल्यावर शिक्षणाचा विषय बाजूला राहून जातो.

पण एका आईने आपल्या मुलासह शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी पीएचडी पूर्ण केली. तर, त्यांचा मुलगा राघव याने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बंगळुरूमधून एमटेक पूर्ण केलं. दोघांना एकाच मंचावर एकत्र बोलावून पदवी देण्यात आली, व टाळ्यांचा कडकडाटाने कौतुक करण्यात आले. सध्या या माय लेकाचं तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे(Karnataka: Mother-son duo receives degrees together).

द न्यू इंडिअन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, रंजनी निरंजन म्हणतात, 'राघव म्हणजेच माझ्या मुलासोबत शिक्षण पूर्ण करताना मला खूप छान वाटलं. प्रत्येकाला अशी संधी मिळणार नाही, पण मला मिळाली, माझ्याकडून संधीचं सोनं झालं. मी माझ्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसले आणि शिक्षण घेतलं. सुरुवातीला या गोष्टी आव्हानात्मक वाटत होत्या. पण शिक्षणाला वय नसतं.'

ना गुळ - ना साखर, कपभर ड्रायफ्रुट्सची करा पौष्टीक बर्फी; मिळेल ताकद-हाडंही ठणठणीत

पीएचडी सुरु करण्यापूर्वी रंजनी यांनी पीईएस विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. त्याआधी पीईएस विद्यापीठात संगणक विज्ञान सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी क्लासिफिकेशन ऑफ अल्गोरिदम' या विषयावर रिसर्च पूर्ण केलं.

मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

आपल्या या प्रवासाच्या आठवणी सांगताना रंजनी म्हणाल्या, 'शिक्षण पूर्ण करताना मुलाने खूप मदत केली. दोघांनी मिळून एकत्र तयारी केली.' याबद्दल राघव म्हणाला, 'मी तिला मशीन लर्निंग बद्दलच्या शंका विचारायचो, कारण तो तिच्या पीएचडीचा विषय होता, आणि ती मला कोडींगबद्दल विचारायची. मला विश्वास बसत नाही, आम्ही हा टप्पा एकत्र पार केला.'

जिद्द असेल तर, सर्व काही शक्य आहे. शिक्षणाला वय नसतं हेच यातून दिसून येतं. त्यामुळे स्वप्न पाहिली असेल तर ती पूर्ण करण्यासाठी मनात जिद्दही ठेवा. स्वप्नं पूर्ण होतील.

Web Title: Karnataka: Mother-son duo receives degrees together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.