Lokmat Sakhi >Social Viral > karva Chauth 2021 : व्वा कमाल! सोनाली ब्रेंद्रेनं करवा चौथसाठी घातला १९ वर्ष जूना लग्नाचा लेहेंगा; अन् म्हणाली.....

karva Chauth 2021 : व्वा कमाल! सोनाली ब्रेंद्रेनं करवा चौथसाठी घातला १९ वर्ष जूना लग्नाचा लेहेंगा; अन् म्हणाली.....

karva Chauth 2021 : सोनालीने या लेहेंग्यासह केसांमध्ये गुलाबी फुलं लावली आहेत. यासोबतच ती अगदी साध्या लूकमध्येही ती डिसेंट दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:57 PM2021-10-24T19:57:56+5:302021-10-24T20:21:14+5:30

karva Chauth 2021 : सोनालीने या लेहेंग्यासह केसांमध्ये गुलाबी फुलं लावली आहेत. यासोबतच ती अगदी साध्या लूकमध्येही ती डिसेंट दिसत आहे.

karva Chauth 2021 : Sonali bendre shares beautiful photos in 19 year old wedding lehenga on karva chaut | karva Chauth 2021 : व्वा कमाल! सोनाली ब्रेंद्रेनं करवा चौथसाठी घातला १९ वर्ष जूना लग्नाचा लेहेंगा; अन् म्हणाली.....

karva Chauth 2021 : व्वा कमाल! सोनाली ब्रेंद्रेनं करवा चौथसाठी घातला १९ वर्ष जूना लग्नाचा लेहेंगा; अन् म्हणाली.....

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे  (Sonali bendre) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसोबत मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसते. अलीकडे सोनाली तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. करवा चौथच्या (karva Chauth)  निमित्ताने सोनाली बेंद्रेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिनं तिचे काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे.

सोनालीने या लेहेंग्यासह केसांमध्ये गुलाबी फुलं लावली आहेत. यासोबतच ती अगदी साध्या लूकमध्येही छाप पाडत आहे. हे फोटो शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'माझा नेहमी विश्वास आहे की तुमची परंपरा तुम्ही बनवता... माझ्यासाठी हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील पूल आहे. या परंपरा कुठून आल्या आहेत याचा मी आदर करते पण मी माझा स्वतःचा अर्थ सांगायला लाजत नाही.

तिने पुढे लिहिले- 'करवा चौथ हा असाच एक सण आहे, जो मी संपूर्ण कुटुंब, मित्रांसह साजरा करते. आपल्या आवडत्या लोकांसोबत आज परंपरेने साजरा केलेला दिवस. हा सण माझ्यासाठी बोनस आहे. सोनाली म्हणते की हा सण म्हणजे सहवास, सोबती, आपण आपल्या पतींसोबत सामायिक केलेल्या प्रेमाचा उत्सव आहे. सोनाली याआधीही तिच्या इंटरेस्टिंग पोस्टमुळे प्रचंड चर्चेत होती.

गणेश चतुर्थीला नेसलेल्या साडीमुळे चर्चेत होती सोनाली

अभिनेत्रीने चंदेरी काठ असलेली फिकट गुलाबी रंगाची जामदानी साडी निवडली होती. तिने लिनेन क्रॉप-टॉप ब्लाउज आणि सिंपल दागिन्यांसह साडी नेसली होती. यावेळी तिनं सोन्याच्या बांगड्या आणि स्मार्ट वॉच हातात परिधान केले होते. 'सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा', असं कॅप्शन या फोटोला देत तिनं सगळ्यांना गणपती उत्सवाच्या  शुभेच्छा दिल्या. सोनाली बेंद्रेने परिधान केलेल्या ऑल ओव्हर चेन जामदानी साडीची किंमत अनविलाच्या वेबसाइटवर 57,000 रुपये होती.

Web Title: karva Chauth 2021 : Sonali bendre shares beautiful photos in 19 year old wedding lehenga on karva chaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.