साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र समजले जाते. भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. साड्यांच्या काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मटेरियलवरून पडतात, तर काही त्या साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून ओळखल्या जातात. साडी हा भारतीय स्त्रियांचा खास पारंपरिक, वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार आहे. साडी नेसायला अवघड असली तरी, संपूर्ण जगात तिच्याबद्दल अपार उत्सुकता असते. जी नेसल्यावर स्त्री सुंदर, आकर्षक, सर्वांहून वेगळी दिसते.
संसदेतील अधिवेशनात किंवा बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या पेहरावामुळं नेहमीच चर्चेत असतात. निर्मला सीतारमन यांची इंग्रजीतील भाषणांची नेहमीच चर्चा होत असते. परंतु त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना नेसलेल्या लाल रंगाच्या साडीवरून खूपच चर्चा होत आहे. निर्मला सीतारामन या नेहमी साडीच नेसतात. त्यांच्या साड्यांचे रंगही भडक नसतात. त्या नेहमी डोऴ्यांना सुखावतील अशा रंगाच्या साड्या निवडतात. जसे, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा इत्यादी. त्या हँडलूमच्या साड्या नेसणे पसंत करतात. अनेकदा त्या सूती साड्याही नेसतात(Nirmala Sitharaman wears traditional temple border red saree on Budget day 2023).
निर्मला सीतारामन यांच्या साडीची चर्चा...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (बुधवारी) सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विविध करामध्ये दिलेल्या सवलतीमुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्व घडामोडीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची साडी चर्चेत आली. ही साडी यांच्यासाठी खास डिझाईन करण्यात आली होती. निर्मल सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेली लाल रंगांची साडी कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात तयार करण्यात आली होती. हाताने तयार केलेली ही साडी इल्कल (Ilkal) सिल्क पासून तयार करण्यात आली होती. त्यांनी नेसलेली साडी कसुती प्रकारांतील होती. कसुती साडी हे धारवाडचे खास वैशिष्ट आहे. हाताने तयार केलेल्या या साडीवर सामान्यतः रथ, हत्ती, मंदिराचे गोपुर, मोर, हरीण, कमळ आदींची नक्षी साकारली जाते. निर्मला सीतारामन यांनी परिधान केलेल्या साडीवर रथ, मोर आणि कमळ होते.
लाल रंग का निवडला...
केंद्रिय मंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साड्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या साड्यांची निवड खूपच वेगळी आहे. याआधी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ज्या साड्या नेसल्या आहेत त्यादेखील खूपच सुंदर आणि आकर्षक होत्या. यावर्षी देखील त्या कोणती साडी नेसणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. या वर्षी त्यांनी काळ्या आणि सोनेरी काठाच्या डिझानसह एक लाल रेशमी साडी नेसली होती. ही साडी परिधान करून त्यांचे साधे पण आकर्षक व्यक्तिमत्व उठून दिसत होते.
पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अंतिम पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, निर्मला सीतारामन यांनी समृद्धी, आशा आणि परिवर्तनाची छाया निवडली. ज्यामुळे त्यांनी चमकदार लाल रंगाची साडी नेसली.हिंदू परंपरेत, लाल रंग सामान्यत: देवी दुर्गाशी संबंधित आहे, स्त्री शक्ती आणि शक्तीचे मूर्त स्वरूप. त्यामुळे त्यांनी साडीचा हा रंग निवडला असल्याचे सांगण्यात आले.
निर्मला सीतारामन यांचे साडी प्रेम...
निर्मला सीतारामन यांचे स्वदेशी गोष्टींवर फारच प्रेम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्वदेशी गोष्टी वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. हातमाग आणि रेशमी साड्या त्यांना फारच जवळच्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक वेळा हातमागांच्या साड्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला हातमागाच्या साड्या नेसायला फारच आवडतात, अशी कबूली त्यांनी दिली. २०१९ मध्ये त्यांनी आपल्या साडी प्रेमाबद्दल काही खास गोष्टी आपल्या चाहत्यांना सांगत ट्विट केले होते. "सिकल किंवा कॉटन, ओरिसा - हँडलूम साड्या माझ्या आवडत्या साड्या आहेत - त्यांचा रंग, विणकाम, टेक्श्चर खूपच मस्त.