Lokmat Sakhi >Social Viral > कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

Celebrities wedding photos for millions: लग्न म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त खर्चच खर्च असतो... पण तेच सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र उलटं होत आहे.. आता हेच बघा ना कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal) आणि इतर काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या लग्नाचे फोटो विकून चांगलीच बक्कळ कमाई केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 02:50 PM2021-12-09T14:50:51+5:302021-12-09T14:52:28+5:30

Celebrities wedding photos for millions: लग्न म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त खर्चच खर्च असतो... पण तेच सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र उलटं होत आहे.. आता हेच बघा ना कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal) आणि इतर काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या लग्नाचे फोटो विकून चांगलीच बक्कळ कमाई केली आहे.

Katrina Kaif to Priyanka Chopra: Bollywood stars sold their wedding photos for millions! | कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा; लग्नाचे फोटो विकून पाहा कोणी किती कोटी कमावले?

Highlightsया माध्यमातून एवढी जास्त किंमत मिळविणारे कतरिना आणि विकी हे पहिलेच सेलिब्रिटी कपल असल्याची चर्चाही सर्वत्र सुरू आहे.

कतरिना आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal's wedding) यांचा विवाह सोहळा सध्या भारतभर गाजतो आहे. लग्नाला कोण पाहूणे येणार इथपासून ते लग्नात कशाची मेजवानी असणार... असं सगळं सगळं जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप जास्त उत्सूक आहेत. आता त्यांच्या लग्नाला तर काही जाता येणार नाही. त्यामुळे लग्नाचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडियो बघायचे आणि समाधान मानायचं, एवढंच चाहत्यांच्या हातात. पण हाय रे देवा.. यावर पण बंदी आली ना... कारण कतरिना आणि विकी यांच्या लग्नातल्या प्रत्येक इव्हेंटच्या (event) फोटोंचे आणि व्हिडियोंचे अधिकार फक्त आपल्याकडेच सुरक्षित रहावेत आणि ते आपल्या व्यतिरिक्त कुणीही लिक करू नये, यासाठी एका ओटीटी एजन्सीने (OTT agency)या दोघांना भरपूर मोठी रक्कम देऊ केली आहे. 

 

त्यामुळेच तर राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधोपूर येथे होणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी (marriage ceremony) येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल, कॅमेरा असं काहीही घेऊन येता येणार नाही. लग्नाचे फोटो आणि व्हिडियो लिक होऊ नये, यासाठी विवाहस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कारण या दोघांनीही एका आघाडीच्या ओटीटी एजन्सीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला असून त्या एजन्सीला लग्नाचे व्हिडियो आणि फोटो विकण्यासाठी त्यांनी तब्बल ८० कोटी  (80 crore) रूपये एवढी किंमत ठरवली आहे. ही रक्कम १०० कोटी असावी, असाही अंदाज काही ठिकाणी व्यक्त होत आहे. या माध्यमातून एवढी जास्त किंमत मिळविणारे कतरिना आणि विकी हे पहिलेच सेलिब्रिटी कपल असल्याची चर्चाही सर्वत्र सुरू आहे.

 

स्वत:च्यात लग्नातून कमाई करण्याची ही आयडिया काही नवी नाही. यापुर्वी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ यांनीही अशाच पद्धतीने त्यांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडियो एका प्रायव्हेट एजन्सीला विकले होते आणि त्या माध्यमातून चांगलीच कमाई केली होती. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra and Nick Jonas) यांचं लग्न २०१८ साली झालं. त्यावेळी त्यांचं लग्न बॉलीवूडमधलं तेव्हा पर्यंतचं सगळ्यात खर्चिक आणि शाही लग्न ठरलं. विदेशातल्या एका मॅग्झिनला त्यांनी तब्बल १८ कोटी (18 crore) रूपयांना फोटो विकले. 

 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohli) हे देखील असंच एक जोडपं.. त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात इटली येथे पार पडलं. त्यांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो परदेशातल्या एका मासिकाला विकले होते. त्यांनीही त्या कंपनीकडून करोडो रूपये घेतले. फोटो विकून मिळालेला सगळा पैसा त्यांनी चॅरिटीसाठी वापरला असं याबाबत सांगण्यात येतं.  

 

प्रिती झिंटा आणि  जीन गुडइनफ (Preity Zinta and Gene Goodenough) यांनी २०१६ साली लॉस एंजेल्स येथे लग्न केलं. आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडियो त्या दोघांनीही गुप्त ठेवले. त्यानंतर या फोटाेंचा आणि व्हिडियोंचा लिलाव केला आणि त्यातून आलेली रक्कम चॅरिटीसाठी वापरली. ही सगळी रक्कम त्यांनी गरजू, गरीब घरातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली होती. 

 

Web Title: Katrina Kaif to Priyanka Chopra: Bollywood stars sold their wedding photos for millions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.