Join us  

कतरिना कैफच्या हातांवर रंगणार जगप्रसिद्ध सोजत मेहंदी! अस्सल राजस्थानी मेहंदीची खासियत माहिती आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 4:09 PM

Katrina Kaif- Vicky Kaushal wedding mehandi : बाॅलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. आता कतरिना लग्नात कोणती मेहंदी लावणार हे देखील नुकतेच फायनल झाले असून तिच्यासाठी म्हणे खास जगप्रसिद्ध सोजत (Sojat)मेहंदी मागविण्यात आली आहे.... 

ठळक मुद्देज्याप्रमाणे आपण सोने, शेअर्स या गोष्टींच्या दराची चर्चा करतो, त्याप्रमाणे सोजतला मेहंदीच्या दराबाबत चर्चा केली जाते.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या तयारीचे फोटो, लग्नासाठी त्यांची शॉपिंग अशा सगळ्या गोष्टी सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. अर्थातच बॉलीवूडची बबली गर्ल कतरिना कैफ ( Katrina Kaif) आणि tall,dark and handsome या कॅटेगिरीत येणारा आणि म्हणूनच तरूणींचा विशेष आवडता असणारा अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) यांचा विवाह म्हणजे चर्चेचीच बाब असणार यात शंका नाही. डिसेंबर महिन्यात ७ ते ९ तारखेदरम्यान राजस्थानात हा विवाह सोहळा होणार आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. विवाहस्थळापासून ते लेहेंग्यापर्यंत सर्वकाही बेस्टच असले पाहिजे असा या दोघांचाही आग्रह. त्यामुळेच तर हे दोघेही त्यांच्या लग्नाची सगळी शॉपिंग अतिशय choosy होऊन करत आहेत.

 

म्हणूनच तर तब्बल दोन वेळा ट्रायल घेतल्यानंतर आता कुठे कतरिनाने तिच्यासाठी लग्नाची मेहंदी कुठून येणार हे फायनल केले आहे. मेहंदी हा लग्न सोहळ्यातला अविभाज्य भाग. आजवर कोणतंही लग्न बिना मेहंदीचं लागलं नसणार. लग्नात नवरीच्या हातावरची मेहंदी किती रंगते हा देखील लग्नाला येणाऱ्या बहुसंख्य महिलांच्या चर्चेचा मुख्य विषय. म्हणूनच तर आपल्या हातावरची मेहंदी बेस्ट आणि भरपूर रंगणारी हवी, अशी कतरिनाची इच्छा आहे. त्यामुळेच तर तिने खास तिच्यासाठी आणि तिच्या जवळच्या नातलगांसाठी जगप्रसिद्ध मेहंदी मागवली आहे.

 

कतरिनासाठी येणारी मेहंदी राजस्थानच्या सोजत या गावाहून येणार आहे. सोजत हे ठिकाण मेहंदीसाठी प्रसिद्ध असून तिथे जगातली सगळ्यात मोठी मेहंदीची बाजारपेठ आहे. त्यामुळे मेहंदी नगरी म्हणूनच या ठिकाणाला ओळखले जाते. या ठिकाणाहून जगभरात  १०० पेक्षाही अधिक देशांमध्ये मेहंदीची निर्यात केली जाते. भारतातले अनेक मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्या विवाह सोहळ्यात सोजत येथूनच मेहंदी मागविण्यात येते. Rajasthani Heena म्हणून ही मेहंदी ओळखली जाते. 

 

सोजत मेहंदीची खासियत- सोजत मेहंदी हातावर लावली की तिचा रंग काळपट लाल रंगाचा दिसू लागतो.- अशा प्रकारच्या मेहंदीचं उत्पादन करणारी विशिष्ट पद्धतीची माती भारतात केवळ सोजत या गावातच आढळून येते, असं याबाबत सांगितलं जातं.- सोजतच्या मातीत तांब्याचं प्रमाण खूप जास्त असून तिथल्या पाण्याच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे या मेहंदीला असा विशिष्ट प्रकारचा रंग येतो.- सोजतमध्ये तयार होणारी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक मेहंदी निर्यात केली जाते. सोजत मेहंदीला मानांकन देखील मिळाले आहे. - सोजत शहरात राहणारे ८० टक्क्यांपेक्षाही अधिक लोक मेहंदीच्या व्यवसायात गुंतलेले असून मेहंदी उत्पादन आणि विक्री हेच त्यांच्या रोजगाराचे मुख्य साधन आहे.

- सोजत मेहंदीचे भाव दरदिवशी बदलत असतात. मागणी किती आणि पुरवठा किती यावरून तेथे मेहंदीचे भाव ठरतात. दररोज सायंकाळी ४ ते ५ यादरम्यान तेथे मेहंदीचे भाव घोषित केले जातात. ज्याप्रमाणे आपण सोने, शेअर्स या गोष्टींच्या दराची चर्चा करतो, त्याप्रमाणे सोजतला मेहंदीच्या दराबाबत चर्चा केली जाते.- सोजत मेहंदीचा सरासरी दर ४० किलोसाठी ३४०० रूपये एवढा असून लग्नसराई आणि सणावाराला हा दर ४० किलोसाठी ४५०० रूपयांपर्यंत वाढलेला असतो.- सोजत मेहंदीच्या एका कोनाची किंमत ३५ ते ४० रूपये आहे. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलखरेदीराजस्थानकतरिना कैफविकी कौशल