आजकाल बऱ्याच घरांमध्ये फ्रिजचा वापर होतो. पदार्थ फ्रेश, पाणी थंड आणि बऱ्याच गोष्टी स्टोर करण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो. पण अनेकदा फ्रिजमध्ये आपण पदार्थ ठेऊन विसरून जातो (Refrigerator Tips). ज्यामुळे फ्रिजमधून उग्र गंध येऊ लागतो. ज्यामुळे फ्रिजमधील इतर गोष्टीही खराब होतात. फ्रिजला नेमकं कधी साफ करावे? फ्रिजला मेन्टेन ठेवण्यासाठी काय करावे?
फ्रिज खराब होऊ नये म्हणून त्याची काळजी कशी घ्यावी? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील (Cleaning Tips). जर आपल्याला फ्रिज वारंवार साफ करण्याची वेळ येत असेल तर, ३ टिप्सची मदत घेऊन पाहा. आपण या टिप्सच्या मदतीने फ्रिज अधिक वेळ स्वच्छ ठेऊ शकता (Kitchen Tips & Tricks). शिवाय त्यातून उग्र गंध आणि लवकर खराबही होणार नाही(Keep it Fresh - How to Get Rid of Bad Smell From the Fridge).
फ्रिज स्वच्छ राखण्यासाठी खास ३ टिप्स
टेम्प्रेचर सेट
बॅक्टेरियाची वाढ होऊ नये, यासह अन्न अधिक फ्रेश राहावे यासाठी फ्रिजचे टेम्प्रेचर योग्यरित्या सेट करून ठेवा. फ्रिजचे तापमान नेहमी, 35-38 °F (1.6-3.3 °C)इतके ठेवा. यामुळे अन्न जरी कुजले तरी, यातून दुर्गंधी येणार नाही. शिवाय यातून निघणारे बॅक्टेरिया फ्रिजमध्ये पसरणार नाही. मुख्य म्हणजे अन्न अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवणे टाळा. यामुळे अन्नाची नासाडी होणार नाही.
जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...
फूड स्टोरेज
उरलेले पदार्थ नेहमी हवाबंद डब्यात किंवा स्वच्छ कंटेनरमध्ये साठवून ठेवा. यामुळे अन्न ताजे राहते. शिवाय फ्रिजमध्ये सांडण्याची भीतीही नसते. शिवाय त्यातून येणारा गंध फ्रिजभर पसरत नाही. ज्यामुळे फ्रिज अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित दिसते.
शिदोरीत बांधून दिलेली गावरान कांद्याची चटणी, चमचमीत इतकी की मळ्यातल्या जेवणाची येईल आठवण..
अशा प्रकारे दुर्गंधी दूर करा
फ्रिजमधून येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी, दररोज स्वच्छ करण्याची गरज नाही. बेकिंग सोडाच्या मदतीने आपण फ्रिज स्वच्छ ठेऊ शकता. यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये बेकिंग सोड्याचा खुला बॉक्स ठेवा. दर ३ महिन्यांनी ते बदला. बेकिंग सोड्यामुळे फ्रिजमध्ये गंध पसरणार नाही. शिवाय स्वच्छही राहील.