घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी, पालींचा उपद्रव काही केल्या कमी होत नाही (Cleaning Tips). घराच्या भिंतीवर पाली सर्रास फिरतात. ज्यामुळे घरात रोगराई देखील पसरते (Lizards). काही घरांमध्ये लहान मुलं देखील असतात. पाली घरात फिरल्यावर विष पसरते. ज्यामुळे आपण आजारी पडण्याची देखील शक्यता निर्माण होते. बऱ्याचदा पाली पाहून किळसवाणे वाटते.
खासकरून स्वयंपाकघरात पालींचा जास्त वावर दिसून येतो. एकदा का घरात पाल शिरली, तर तिला बाहेर घालवणे फार कठीण काम वाटते. पाळी कधी कुठे कोणत्या गोष्टीवर फिरेल हे सांगता येत नाही. जर केमिकल उत्पादनांचा वापर करूनही घरातून पाळी जात नसतील तर, काही घरगुती उपाय करून पाहा. काही मिनिटात पाळी घरातून पळ काढतील(Keep Lizards Out Of The House With Two Ingredients).
पालींना घरातून पळवून लावणारे उपाय
कांदा - लसूण
सर्वात आधी एका स्प्रे बाटलीमध्ये कांद्याचा रस घ्या. त्यात लसणाच्या रसाचे काही थेंब मिसळा. आता त्यात थोडे पाणी टाका आणि बाटली बंद करा आणि नीट हलवा. यांनतर ज्या ठिकाणी पालींचा वावर जास्त असेल त्या ठिकाणी स्प्रे करा. कांदा आणि लसणाच्या उग्र गंधामुळे पाली घरातून पळ काढतील.
लसूण
लसणाच्या उग्र गंधामुळेही पाली घरातून पळ काढतील. यासाठी लसणाच्या पाकळ्या, ज्या ठिकाणी पालींचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी ठेवा. यामुळे त्या ठिकाणी पुन्हा पाली फिरकणार नाही. आपण लसणाऐवजी कांद्याची फोड देखील ठेऊ शकता.
उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल
काळी मिरी
पालींना पळवून लावण्यासाठी आपण काळी मिरीचा देखील वापर करू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा, त्यात काळी मिरी पावडर मिक्स करा. नंतर काळी मिरीचं पाणी ज्या ठिकाणी पाली स्प्रे करा. यामुळे पाली पळून जातील.