Join us  

पावसाळ्यात घरात सतत येणारा कुबट वास घालवण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक एअर फ्रेशनर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 8:49 PM

1 simple way to make your home smell fresh in rainy season with homemade air freshener : बाजारातले महागडे रूम फ्रेशनर तर आपण आणतोच पण आपल्या घरासाठी घरीच बनवा नॅचरल एअर फ्रेशनर...

सध्या सगळीकडेच पावसाचे वातावरण झाले आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे ओलावा जमा होतो. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे व दमटपणामुळे आपल्या संपूर्ण घरात, किचन बाथरूमध्ये सगळीकडेच कुबट घाण दुर्गंधी पसरते. या वारंवार येणाऱ्या दुर्गंधीमुळे घरात राहणे नकोसे वाटते. पावसाळयात घरांतून सतत येणारी ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपण बाजारांत मिळणाऱ्या वेगवेगळ्या एअर फ्रेशनर्सचा (Air Freshener) वापर करतो.याचबरोबर, घरात एखाद्या खास प्रसंगी पाहुणे येणार असतील तर आपण घरात सगळीकडे एअर फ्रेशनर स्प्रे करतो. 

विशेष करून पावसाळयात येणारी ही कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी आपण बाजारातील महागडे असे विविध सुगंधी एअर फ्रेशनर मारतो आणि घर सुगंधी करतो. पण हे एअर फ्रेशनर स्प्रे करताना देखील आपण फार काळजी घेतो. त्यामध्ये केमिकलचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे आरोग्याला (Health) नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे ते अधिक वापरु नये किंवा जास्त वापर केल्यास ते संपण्याची भिती असते. कारण ते फार महागडे असते. त्यामुळे ज्यावेळी गरज असते त्याचवेळी आपण त्याचा वापर करतो. परंतु आपण घरच्या घरी देखील अगदी सहजरित्या स्वस्तात मस्त असे सुगंधी एअर फ्रेशनर तयार करु शकता. यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील येत नाही(Keep your home smelling wonderful throughout the monsoon with this homemade air freshener).  

 एअर फ्रेशनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. जाडे मीठ - १ बाऊल  २. फॅब्रिक कंडिशनर - २ ते ३ टेबलस्पून   ३. लवंग - १० ते १५ काड्या 

किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...

 एअर फ्रेशनर बनवण्यासाठीची कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये जाडे मीठ घ्यावे. बाऊल संपूर्ण भरेल इतके जाडे मीठ घ्यावे. २. आता त्यावर कोणतेही सुगंधित फॅब्रिक कंडिशनर घालावे. ३. आता या सगळ्या मिश्रणात लवंग उभ्या करून खोचून घ्याव्यात. (लवंग खोचताना त्याच्या फुलाकडचा भाग वर येईल अशा पद्धतीने लवंग खोचून घ्यावे.)

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले हे एअर फ्रेशनर आपण बेडरूम, किचन, तसेच बाथरुम किंवा गाडीतही ठेवू शकता. यामुळे सतत येणारा कुबट वास नाहीसा होण्यास मदत होते.

 

टॅग्स :सोशल व्हायरल