Join us

एसी न वापरताही घर राहील एसीसारखंच गारेगार, पाहा ६ स्मार्ट कूल उपाय-खर्च रुपये शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2025 15:50 IST

Keep Your Room Cool Without AC - See Tricks : एसी न वापरता खोली गार करा. हे घरगुती उपाय करून तर बघा.

मार्च सुरू झाला की पंखा चालू आहे की नाही ते कळतच नाही. सकाळ काय आणि संध्याकाळ काय अंगातून नुसत्या गरम वाफा निघत असतात. दुपारच्या वेळी तर विचारूच नका. (Keep Your Room Cool Without AC - See Tricks )एकदा का सूर्य त्याच्या फॉर्ममध्ये आला की, आपल्या शरीरातील सगळं पाणी घामा वाटे काढून टाकतो. कपडे भिजून जातात. चेहराही लाल होतो. ऊन्हामुळे त्वचाही करपायला लागते. झोपेची तर अगदीच वाट लागून जाते. (Keep Your Room Cool Without AC - See Tricks )रात्री तर एकवेळ जरा आराम असतो. पण दिवसभर घरात बसल्यावरही असे वाटते की गॅसवरच बसलो आहोत. 

सगळ्यांच्याच घरी एसी नसतो. एसी ही मूलभूत गरज नाही ती चैनेची वस्तू आहे. ज्यांच्याकडे एसी आहे, असेही लोक रोज दिवसभर तर तो वापरू शकत नाहीत. (Keep Your Room Cool Without AC - See Tricks )कारण एसीचे बील फार जास्त येते. अशावेळी काही तरी अक्कल लढवायची आणि शून्य खर्चांमध्ये घरातच काही प्रयोग करून पाहायचे. 

१. फ्रिझरमध्ये प्लॉस्टिकच्या पातळ बाटल्या भरून ठेवायच्या. बाटलीतील पाण्याचा बर्फ झाला की, त्या बाटल्या टेबल फॅनच्या आजूबाजूला ठेवायच्या. पंख्यामधून येणारा वारा मस्त गार येतो. बर्फ वितळला की परत फ्रिझरला ठेवायच्या. पाणी बदलायचीही गरज नाही.

२. बर्फाच्या पाण्यामध्ये पंचे बुडवून ठेवायचे. दुपारच्या वेळी पिळून घ्यायचे आणि खिडकीपाशी तसेच दरवाज्यापाशी लटकवायचे. पूर्ण खिडकी बंद करून घ्यायची. खोलीमधील तापमान कमी जाणवते.

३.घराच्या काचा तसचे दरवाजे बाहेरूनही पाण्याचे पुसायचे. पंखे आपण सारखे पुसत नाही. पण पंखेही सातत्याने पुसत राहा. पंख्याच्या पात्या गरम झाल्या की ,आतील यंत्रामुळे त्या गरमच राहतात. गार होत नाहीत.

४. लादी पुसत राहायची.  दुपारच्या वेळी घरात शक्य असल्यास काळोख करायचा. दारे व खिडक्या बंद करून ओल्या फडक्याने झाकायच्या. संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर पुन्हा उघडायच्या. 

५. तोंड धुवायचे आणि न पुसता तसेच ठेवायचे. असे केल्याने चेहऱ्याला उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. दुपारी शक्य असल्यास गार पाण्याने अंघोळ करायची. शरीराला थंडावा मिळतो.

६. ओल्या फडक्याने शरीर पुसत राहायचे. ओल्या हाताला किंवा पायाला साधा वारा लागला तरी तो गारच भासतो. आजारी पडाल एवढंही पाणी वापरू नका.       

टॅग्स :समर स्पेशलहोम रेमेडीउष्माघातपाणी