Lokmat Sakhi >Social Viral > ना जास्त मेहनत - ना साबणाचा वापर, फक्त २ मिनिटात चहाची गाळणी साफ करण्याची भन्नाट ट्रिक

ना जास्त मेहनत - ना साबणाचा वापर, फक्त २ मिनिटात चहाची गाळणी साफ करण्याची भन्नाट ट्रिक

Keep Your Tea Strainer Clean, Here's How काळी पडलेली चहाची गाळणी दिसेल चकाचक, २ मिनिटात साफ करण्याची नवी ट्रिक पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 11:53 AM2023-08-25T11:53:37+5:302023-08-25T11:54:37+5:30

Keep Your Tea Strainer Clean, Here's How काळी पडलेली चहाची गाळणी दिसेल चकाचक, २ मिनिटात साफ करण्याची नवी ट्रिक पाहा..

Keep Your Tea Strainer Clean, Here's How | ना जास्त मेहनत - ना साबणाचा वापर, फक्त २ मिनिटात चहाची गाळणी साफ करण्याची भन्नाट ट्रिक

ना जास्त मेहनत - ना साबणाचा वापर, फक्त २ मिनिटात चहाची गाळणी साफ करण्याची भन्नाट ट्रिक

सकाळी एक कप चहा मिळाला, तर संपूर्ण दिवस एनर्जेटिक जातो. प्रत्येक घरात एक तरी चहाप्रेमी असतोच. चहा करण्यासाठी चहापावडर, दूध, साखर आणि पाण्यासोबतच चहाची गाळणी देखील गरजेची असते. चहा गाळणीचा वापर दररोज केल्याने ती लवकर खराब होते, काळसर दिसू लागते. त्यात चहाचे कण साचू लागतात. जे सहसा घासल्याने निघून जात नाही.

काही लोकं चहाची गाळणी काळी पडल्यानंतर फेकून देतात, किंवा दुसरी नवीन आणतात. परंतु, चहाची गाळणी बदलण्यापेक्षा मेहनत न घेता, साबणाचा वापर न करता, दोन मिनिटात साफ करा. जर आपण स्टील किंवा मेटलची चहाची गाळणी वापरत असाल तर, ही ट्रिक आपल्या नक्कीच उपयुक्त ठरेल(Keep Your Tea Strainer Clean, Here's How).

चहाची गाळणी या पद्धतीने करा साफ

पहिली ट्रिक

- सर्वप्रथम, चहाची गाळणी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दुसरीकडे गॅस चालू करा. व हाय फ्लेमवर गॅस ठेवा. आता त्यावर चहाची गाळणी ठेवा.

- ३० सेकंदात चहाच्या गाळणीची जाळी गरम होऊन लाल होईल, व त्यातून काळा धूर निघू लागेल. दोन्ही बाजू ३० सेकंद ठेवा.

फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन

- आता गॅस बंद करा आणि गाळणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता जुन्या ब्रशच्या मदतीने चहाची गाळणी घासून स्वच्छ करा. त्यानंतर पाण्याने धुवून काढा. या सोप्या ट्रिकमुळे मेहनत न घेता, साबणाचा वापर न करता एक मिनिटात चहाची गाळणी स्वच्छ होईल.

दुसरी ट्रिक

- चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत कोमट पाणी घ्या, त्यात एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करा.

पांढरे कपडे धुवून - धुवून पिवळट पडले? एक भन्नाट ट्रिक - धुतल्याक्षणी कपडे दिसतील पांढरेशुभ्र

- या पेस्टमध्ये चहाची गाळणी १० मिनिटासाठी बुडवून ठेवा. १० मिनिटानंतर ब्रशने घासून गाळणी स्वच्छ करा.

Web Title: Keep Your Tea Strainer Clean, Here's How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.