Join us  

मेंदू खाणारा अमिबा-पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; या भलत्याच आजाराची लक्षणं, उपाय काय..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:47 PM

Kerala Boy Dies Of Brain Eating Amoeba : सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कधीकधी हा अमिबा गलिच्छ स्विमिंग पूल इत्यादींमध्ये देखील आढळू शकतो.

केरळमध्ये (Kerala) गुरूवारी एका १४ वर्षांच्या मुलाला आपला जीव  गमावावा लागला आहे. Naegleria fowleri  नावाच्या ब्रेन इन्फेक्शनमुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा ब्रेन इटींग अमिबा असून संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अमिबा फ्रेश पाणी आणि तलावांमध्ये दिसून येतो. या संक्रमणामुळे २ महिन्यात  ३ जणांना मृत्यू झाला आहे. ब्रेन इटींग अमिबा आणि संक्रमणाची लक्षणं समजून घेऊ. (Kerala Boy Dies Of Brain Eating Amoeba)

गुरुवारी, केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हे एक प्रकारचा ब्रेन इन्फेक्शन आहे, जे ब्रेन इटिंग अमीबाच्या संसर्गामुळे होतो.  सदर घटनेतील मृत तरूण हा तलावात आंघोळ करत असताना नाकातून अमिबा मुलाच्या शरीरात शिरला ज्यामुळे मेंदूपर्यंत संक्रमण पोहोचले.

त्यानंतर 24 जून रोजी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. ब्रेन इटिंग अमिबा संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांत एकूण तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे या घातक मेंदूच्या संसर्गाबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेन इटिंग अमिबा म्हणजे काय आणि आपण ते कसे टाळू शकतो ते जाणून घेऊया.

ब्रेन इटींग अमिबा काय असतो? (What Is Brain Eating Amoeba)

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, नेग्लेरिया फावलेरी हा मुक्त जिवंत अमीबा आहे, ज्याला सामान्यतः ब्रेन इटिंग अमीबा म्हणतात. ते उबदार गोड्या पाण्यात राहतात, म्हणजे उबदार गोड्या पाण्याचे तलाव इ. हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेला संक्रमित करू लागतो, जे घातक आहे.

ब्रेन इटिंग अमिबा मेंदूच्या ऊतींना इजा करू लागते, ज्यामुळे मेंदूचा संसर्ग होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, कधीकधी हा अमिबा गलिच्छ स्विमिंग पूल इत्यादींमध्ये देखील आढळू शकतो. त्याची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर दोन ते १५ दिवसांनी दिसू लागतात.

लक्षणं (Symptoms Of Brain Eating Amoeba)

डोकेदुखी, ताप, उलट्या होणं, मानेत वेदना, गोंधळ होणं, कोमात जाणं.

बचावाचे उपाय (Prevention Of Brain Eating Amoeba)

कोणत्याही पाण्यात नोज प्लगशिवाय जाऊ नका. कारण त्या पाण्यात ब्रेन इटींग अमिबा असण्याची शक्यता असते. नाक साफ करण्यासाठी पाणी उकळवून थंड करून घ्या नंतर  याचा वापर करा. क्लोरिनेडेट स्विमिंग पूलचा वापर करा, गरम पाणी किंवा तलाव, स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर डोकेदुखीची समस्या उद्भवल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. 

टॅग्स :सोशल व्हायरलकेरळ