Lokmat Sakhi >Social Viral > प्रवासात बसमध्ये झाली महिलेला प्रसूतीवेदना, बस ड्रायव्हर-कंडक्टरच्या माणूसकीने केली कमाल

प्रवासात बसमध्ये झाली महिलेला प्रसूतीवेदना, बस ड्रायव्हर-कंडक्टरच्या माणूसकीने केली कमाल

Kerala woman gives birth to baby birl on KSRTC bus : हॉस्पिटल जवळ असतानाही बसमध्येच महिलेची डिलीव्हरी; बस चालकाचे विशेष कौतुक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 04:58 PM2024-05-31T16:58:20+5:302024-05-31T19:14:38+5:30

Kerala woman gives birth to baby birl on KSRTC bus : हॉस्पिटल जवळ असतानाही बसमध्येच महिलेची डिलीव्हरी; बस चालकाचे विशेष कौतुक कारण..

Kerala woman gives birth to baby birl on KSRTC bus | प्रवासात बसमध्ये झाली महिलेला प्रसूतीवेदना, बस ड्रायव्हर-कंडक्टरच्या माणूसकीने केली कमाल

प्रवासात बसमध्ये झाली महिलेला प्रसूतीवेदना, बस ड्रायव्हर-कंडक्टरच्या माणूसकीने केली कमाल

हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेली आपण ऐकलं असेल (Kerala News). पण अनेकदा इमर्जन्सी प्रसूती विमान, ट्रेन किंवा मध्यरस्त्यातही होते. असंच एका बाळाचा जन्म बसमध्ये झाला आहे (Birth). हॉस्पिटल जवळ असतानाही बसमध्येच महिलेची डिलीव्हरी करण्यात आली आहे. पण हॉस्पिटल जवळ असताना बसमध्येच प्रसूती करण्याचं कारण काय?

बसमध्ये महिलेची प्रसूती तर झाली, पण विशेष कौतुक बस चालक, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे होत आहे (Social Viral). परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि वेळेचं भान राखत चालक आणि ड्रायव्हरने चपळता दाखवली. शिवाय डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे महिला आणि मूल दोघंही सुखरूप आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकांना माणुसकीचे दर्शन घडून आले आहे(Kerala woman gives birth to baby birl on KSRTC bus).

पंचायतच्या रिंकीची पाहा हिंमत; आईबाबांचा विरोध होता म्हणून घर सोडलं, मुंबईत येऊन स्ट्रगल केला आणि..

बसमध्येच महिलेची प्रसूती, चालक - डॉक्टरांचे विशेष कौतुक

ही घटना केरळमध्ये घडली आहे. ३७ वर्षांची सेरेनाची ६ जूनला प्रसूती होणार होती. अंगामलीहून ती पतीच्या घरी मलप्पुरमच्या तिरुन्नवाला जात होती. तिथल्या तिरुनव्या रुग्णालयात तिची डिलीव्हरी होणार होती. थ्रिसूरहून  केएसआरटीसी बसनं ती प्रवास करीत होती.

मात्र, प्रवासात तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. याची माहिती महिलेच्या पतीने बसमधल्या कंडक्टर आणि चालकाला दिली. वेळेचं गांभीर्य ओळखत बसच्या चालकाने बसचा मार्ग बदलला आणि बस त्रिशूर इथल्या अमला रुग्णालयात नेली, आणि बस थेट रुग्णालयाच्या दारात उभी केली.

यानंतर कंडक्टरने रुग्णालयात जाऊन माहिती दिली. तेथील स्टाफने तातडीने बसमधल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि महिलेवर उपचार सुरु केले. याबाबत अमला रुग्णालयातील डॉक्टर यसीर सुलेमान सांगतात, 'महिलेला बसमध्येच प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या. त्यावेळी बसमधून तिला रुगणालयात हलवणं अश्यक होतं. आम्हाला बसमध्येचं डिलिव्हरी करणं उचित वाटलं. महिला आणि मुल दोघंही आता सुरक्षित आहेत.'

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

बस चालक आणि कंडक्टरचं कौतुक

बस चालक आणि कंडक्टरने दाखवलेल्या प्रसंगवधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य म्हणजे आज त्यांच्यामुळे दोघंही सुखरूप आहेत. 

Web Title: Kerala woman gives birth to baby birl on KSRTC bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.