Join us  

केरळच्या महिलांचा अनोखा डान्स विक्रम, पाहा नृत्याचा व्हायरल व्हिडिओ, डोळ्याचे पारणे फिटते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2023 5:30 PM

Over 7,000 Women Perform Thiruvathira Dance To Set World Record In Kerala’s Thrissur : केरळमध्ये ७०२७ महिलांनी 'थिरुवथिरा' नृत्य करत केला जागतिक विक्रम...

केरळला 'देवांची भूमी' म्हणून ओळखले जाते. भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर असणारे केरळ हे नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध राज्य आहे. केरळ हे समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, परंपरा व कला यांचे माहेरघर मानले जाते. केरळातील लोकांनी आपली खाद्यसंस्कृती, कला, परंपरा यांना जपून ठेवले आहे. या सगळ्या सांस्कृतिक गोष्टींचा वारसा त्यांनी एका पिढी कडून पुढच्या पिढीला देऊ केला आहे. इतकेच नव्हे तर पिढीजात जतन केलेल्या या गोष्टींचा जागतिक विक्रम करण्याची अनोखी घटना सध्या कर्नाटकमध्ये घडली आहे(Over 7,000 Women Perform Thiruvathira Dance To Set World Record In Kerala’s Thrissur).

केरळच्या सर्व-महिला नेटवर्क कुडुंबश्रीने बुधवारी एक अनोखा विक्रम करून कौतुकाची थाप मिळवली आहे. या जागतिक विक्रमामध्ये ७००० हून (Over 7,000 Women Perform Thiruvathira Dance To Set World Record In Kerala’s Thrissur) अधिक महिला सदस्यांनी येथील स्थानिक महाविद्यालयाच्या मैदानावर मेगा 'थिरुवाथिरा'चे आयोजन केले. केरळच्या कुडुंबश्री या सर्व महिला नेटवर्कने कुट्टनेल्लूर शासकीय महाविद्यालयात मेगा थिरुवाथिरा नृत्य (Kerala’s all-woman network Kudumbasree sets world record for mega ‘Thiruvathira’ dance performance) सादरीकरण करून जागतिक विक्रम रचला आहे. कुडूंबश्रीचे ७०२७ महिला सदस्य पारंपारिक सामूहिक नृत्य (7,027 women perform Thiruvathira dance in Kerala, set world record) सादर करण्यासाठी महाविद्यालयाच्या मैदानावर जमले(Over 7,000 Kerala women perform Thiruvathira dance, Create world record).

नेमका काय आहे हा जागतिक विक्रम... 

केरळच्या सर्व - महिला कुडुंबश्री या महिलांच्या गटाने बुधवारी एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. यात ७००० हून अधिक सदस्यांनी येथील स्थानिक महाविद्यालयाच्या मैदानावर मेगा 'थिरुवाथिरा' या केरळच्या पारंपरिक नृत्याचे आयोजन केले होते. 'तिरुवाथिरा' हा केरळमधील एक पारंपारिक सामूहिक नृत्य प्रकार आहे , जो प्रामुख्याने ओणम सणाच्या वेळी आयोजित केला जातो जो चिंगम या मल्याळम महिन्यात येतो. हे धनु या मल्याळम महिन्यात देखील केले जाते. मध्य केरळ जिल्ह्यातील कुट्टनेल्लूर सरकारी महाविद्यालयाच्या मैदानावर कुडुंबश्री गटाच्या महिला सदस्यांनी मेगा 'थिरुवथिरकली' (थिरुवथिरा नृत्य) सादर केले.

घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?

केरळमधील या नृत्य प्रकाराने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कामगिरीचा जागतिक विक्रम नोंदविला आहे. मेगा 'थिरुवथिरकली' नृत्य (थिरुवथिरा नृत्य) करताना सहभागींच्या संख्येमुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि टॅलेंट रेकॉर्ड बुकमध्ये दाखल झाला. आयोजक आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा विचार करत आहेत.

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..

नवऱ्याची इच्छा म्हणून तिने चक्क वाढवली स्वतःची उंची, मात्र ऑपरेशन केल्यावर नवऱ्याने दिला घटस्फोट आणि...

या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री के राजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांचे कौतुक केले. याचबरोबर त्यांनी महिला सक्षमीकरणाचे अनुकरणीय मॉडेल म्हणून कुडूंबश्रीच्या महिला सदस्यांची प्रशंसा केली आणि जगातील सर्वात मोठे महिला नेटवर्क म्हणून तिचे स्थान अधोरेखित केले. या जागतिक विक्रमानंतर लगेचच टॅलेंट वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र कुडुंबश्री प्रतिनिधींना त्याच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद होण्यासाठी लवकरच प्रयत्न सुरु केले जातील असे कुडूंबश्री मिशनच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :सोशल व्हायरल