Join us  

कियारा अडवाणीचा परफेक्ट पिंक लूक व्हायरल, काय आहे को-ऑर्ड ड्रेसची नवी फॅशन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 5:55 PM

फॅशन इन असलेला को-ऑर्ड ड्रेस नेमका असतो तरी कसा

ठळक मुद्देकियाराबरोबरच इतरही बॉलिवूड अभिनेत्रींचे कोऑर्ड फॅशनमधील फोटो आपणही फॉलो करु शकतो ही हटके फॅशन

आपल्या सिंपल आणि क्यूट लूकमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) नेहमी चर्चेच असते. यामुळेच तिचे असंख्य चाहतेही तिच्यावर फिदा असतात. त्यामुळे कियाराही आपल्या सोशल मीडिया हँडलवर सतत वेगवेगळ्या अंदाजातले फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खूश करत असते. स्टाईलच्या आणि फॅशनच्या बाबतीतही कियारा नेहमी तिला जे कम्फर्टेबल वाटते तेच घालत असल्याचे दिसते. नुकतेच कियाराने तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून तिच्या क्यूट स्माईलमुळे चाहते पुन्हा एकदा घायाळ झाल्याचे पाहायला मिळाले. तिच्या पिंक ड्रेसमधल्या परफेक्ट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये कियारा अतिशय फंटास्टिक दिसत असून तिचे स्माइलही तितकेच सुंदर आहे. आपल्या या फोटोजच्या खाली कियाराने हॅपी डेज असे कॅप्शनही लिहीले आहे. यामध्ये तिच्या ड्रेसची फॅशनही एकदम हटके आणि इंटरेस्टींग असल्याचे दिसत आहे. तिने घातलेल्या ड्रेसला को-ऑर्ड ड्रेस (Co-ord Dress) म्हणतात, ज्यामध्ये ती एकदम देखणी दिसत आहे. गुलाबी रंगाच्या क्रॉप टॉपला फ्रिलच्या बाह्या देण्यात आल्या आहेत. या बाह्यांना रफल लूक देण्यात आला आहे. तसेच या टॉपच्याच कापडाची गुलाबी रंगाची पँटही यावर कियाराने घातली आहे. इतकेच नाही तर कॅट आय फॅशनचा गॉगल, साधेसे कानातले आणि पिंक रंगाची लिपस्टीक अशा साध्याशा लूकमध्येही कियाराचे सौंदर्य खुलत आहे. कियारा आपल्याला नेहमीच तिच्या हटके अंदाजामध्ये दिसून येते. या फोटोतही ती अशीच एकदम हटके दिसत आहे. 

काय आहे को-ऑर्ड ड्रेसची फॅशन ? 

सध्या को-आर्डची फॅशन एकदम इन असून बॉलिवूड अभिनेत्रींबरोबरच सामान्य तरुणीही ही फॅशन फॉलो करताना दिसतात. २ पीस मध्ये असणाऱ्या या ड्रेस को ऑर्डीनेशन केलेला ड्रेस असतो. याचा अर्थ वरच्या आणि खालच्या दोन्ही पीससाठी एकाच प्रकारचे, एकाच रंगाचे कापड वापरले जाते. हल्ली अशाप्रकारे कोऑर्डीनेशन करायची फॅशन अकदम इन आहे. यामध्ये पँट आणि टॉप, स्कर्ट आणि टॉप असे को ऑर्डीनेट केले जाते. साधारणपणे यामध्ये प्लेन, फुलांची डिझाइन असलेले कापड आणि उभ्या किंवा आडव्या रेघा असलेल्या कापडाला प्राधान्य दिले जाते. य़ात स्पोर्ट वेअरलाही बरीच पसंती असल्याचे दिसते. गडद रंगाचे कापड यामध्ये प्रामुख्याने वापरले जाते. 

टॅग्स :सोशल व्हायरलकियारा अडवाणीफॅशनखरेदी