Join us

कियारा अडवाणीची ‘लिंबू कलरची’ साडी पाहिली? अंबानींकडच्या गणेशोत्सव समारंभात कियाराने नेसलेल्या ‘लाखो’ रुपयांच्या साडीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 13:29 IST

Kiara Advani’s Yellow Saree From Ambani’s Ganesh Chaturthi : या साडीवर तिनं स्लिव्हजलेस एम्ब्रॉयडरी ब्लाऊजची निवड केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिची स्टाईल, अभिनय कौशल्य आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिने अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. मंगळवारी अंबानींच्या घरी गणेश चतुर्थी सेलिब्रेशनला हजेरी लावताना या जोडप्याने  लक्ष वेधले. सिल्व्हर वर्कचा निळा कुर्ता आणि पायजम्यामध्ये अभिनेता अगदी सुंदर दिसत होता. तर कियाराने 1.85 लाख किमतीची पिवळी साडी नेसली होती. (Kiara Advani’s Yellow Saree From Ambani’s Ganesh Chaturthi Celebration Is Worth Rs 1.85 Lakhs) 

बॉलीवूडशादी डॉट कॉमच्या रिपोर्टनसुार ३१ वर्षीय अभिनेत्रीने पिवळ्या साडीवरच्या लूकमध्ये चाहत्यांची मनं जिंकली.  कियाराने दिग्गज डिझायनर जयंती रेड्डी या लेबलची साडी परिधान केली होती.  साडीची किंमत १ लाख ८५ हजार रूपये इतकी आहे. या साडीवर तिनं स्लिव्हजलेस एम्ब्रॉयडरी ब्लाऊजची निवड केली होती. कानात जड कानातले, बांगड्या, लाईट मेकअप आणि छोटी टिकली असा मेकअप तिने यावेळी केला  होता. 

केसांचे २ भाग करून मागे सिंपल बन बांधून तिने यावर गजरा लावला होता. अँटिलिया येथे हे नवविवाहीत जोडपं पहिल्यांदाच दिसले. यावेळी त्यांनी नेटिझन्सना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडली नाही. लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे ते बरेच चर्चेत आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशन