Lokmat Sakhi >Social Viral > चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

Kids Are Sleeping On The Top Of Moving Car: गाडीतून प्रवास करताना मुलांना सनरुफ देऊन तुम्हीही त्यांचे फाजिल लाड करत असाल तर हा व्हिडिओ एकदा बघाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 03:49 PM2023-12-28T15:49:33+5:302023-12-28T15:50:14+5:30

Kids Are Sleeping On The Top Of Moving Car: गाडीतून प्रवास करताना मुलांना सनरुफ देऊन तुम्हीही त्यांचे फाजिल लाड करत असाल तर हा व्हिडिओ एकदा बघाच..

Kids are taking sunroof and sleeping on the top of moving car, Must see this dangerous viral video | चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

चालत्या गाडीच्या टपावर झोपली मुलं आणि... व्हायरल व्हिडिओ, सुटीच्या मौसमात मुलांचे जीव धोक्यात?

Highlights व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सनरुफचा असा धोकादायक पद्धतीने दुरुपयोग केला जात असेल तर त्यावर कठोर कारवाई होण्याची मोठीच गरज आहे.

आजकाल मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय मुलांना चारचाकी गाडीतून फिरण्याचं आकर्षण राहिलेलं नाही. त्यांच्यासाठी खरा ॲट्रॅक्शन पॉईंट आहे तो गाडीतून सनरुफचा आनंद घेणं. शहरामध्येही फिरताना हल्ली अनेक लहान मुलं, कॉलेजचे तरुण मुलं सनरुफमधून डोकावताना दिसतात. लाँगड्राईव्हला जाताना तर मुलं हमखास हा हट्ट करतात आणि कहर म्हणजे काही पालकही त्यांचा तो हट्ट पुरवतात. पण अशा पद्धतीने मुलांना सनरुफ देणं किती धोकादायक ठरू शकतं, हे सांगणारा एक व्हिडिओ सध्या साेशल मिडियावर व्हायरल होत आहे. (Kids are taking sunroof and sleeping on the top of moving car)

 

सध्या नाताळानिमित्त सुट्यांचे दिवस आहे. आता ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की अनेक जण गोव्याला जातात. असंच गोव्याला पर्यटनासाठी  गेलेल्या एका कुटूंबाचा तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते कुटूंब गोव्यात कुठेतरी फिरायला निघालं आहे.

सकाळी झोपेतून उठताना अंग आखडतं? अंथरुणावर पडूनच करा ५ व्यायाम- दिवसभर ॲक्टीव्ह राहाल

त्या गाडीतून मुलांनी सनरुफ घेतलं आणि ते गाडीच्या टपावर चक्क झोपले आहेत. गाडी चालू आहे  आणि गाडी चालविणाऱ्या व्यक्तीला मुलं असं काही करत आहेत, याचा अंदाजही  नाही. आता टपावरच्या मुलांना खरंच झोप लागली आहे का किंवा ते नुसतेच पडले आहेत, हे माहित नाही. पण या दोन्ही गोष्टींमध्ये मुलांच्या जिवावर  बेतू शकत होते, एवढे मात्र नक्की.

 

सनरुफचे हे फॅड आता दिवसेंदिवस खूपच वाढले आहे. मुळात गाडीतून अशा पद्धतीने बाहेर डोकावण्यासाठी सनरुफ नसतेच. गाडी अधिक प्रशस्त वाटावी.

खास हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी 'साडी विथ जॅकेट'चा मस्त ट्रेण्ड, दिसाल स्टायलिश- थंडीही वाजणार नाही

मोकळी हवा आणि भरपूर स्वच्छ प्रकाश आत यावा, यासाठी एखाद्या खिडकीप्रमाणे सनरुफची सोय गाड्यांमध्ये देण्यात आली आहे. ज्याप्रकारे खिडक्यांमधून हात बाहेर काढणं धोकादायक आहे, त्याचप्रमाणे सनरुफमधून शरीर बाहेर काढणंही धोकादायक आहे.

फक्त १० रुपयांत चेहऱ्यांवर येईल ब्रायडल ग्लो, बघा टोमॅटो वापरून नेमकं काय करायचं...

म्हणूनच कर्नाटक सरकारने काही दिवसांपुर्वीच गर्दीच्या ठिकाणी किंवा वाहन वेगात असताना जर कुणी सनरुफ घेत असेल तर त्या वाहन चालकाला मोठा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सनरुफचा असा धोकादायक पद्धतीने दुरुपयोग केला जात असेल तर त्यावर कठोर कारवाई होण्याची मोठीच गरज आहे. 

 

Web Title: Kids are taking sunroof and sleeping on the top of moving car, Must see this dangerous viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.