Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजमध्ये अन्न सांडून डाग पडलेत? दुर्गंध येतो? ५ टिप्स- फ्रिज दिसेल चकचकीत, बर्फही साचणार नाह

फ्रिजमध्ये अन्न सांडून डाग पडलेत? दुर्गंध येतो? ५ टिप्स- फ्रिज दिसेल चकचकीत, बर्फही साचणार नाह

Kitchen Cleaning Ideas : फ्रिजच्या रबरमध्ये जमा झालेली घाण, बर्फ काढून व्यवस्थित स्वच्छता करावी लागते. काही सोप्या किचन ट्रिक्स तुमचं हे काम अधिक सोपं  करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:39 PM2023-07-30T12:39:00+5:302023-07-31T13:29:43+5:30

Kitchen Cleaning Ideas : फ्रिजच्या रबरमध्ये जमा झालेली घाण, बर्फ काढून व्यवस्थित स्वच्छता करावी लागते. काही सोप्या किचन ट्रिक्स तुमचं हे काम अधिक सोपं  करू शकतात.

Kitchen Cleaning Ideas : How to Clean a Refrigerator What is best way to clean inside refrigerator | फ्रिजमध्ये अन्न सांडून डाग पडलेत? दुर्गंध येतो? ५ टिप्स- फ्रिज दिसेल चकचकीत, बर्फही साचणार नाह

फ्रिजमध्ये अन्न सांडून डाग पडलेत? दुर्गंध येतो? ५ टिप्स- फ्रिज दिसेल चकचकीत, बर्फही साचणार नाह

स्वंयपाकघरात उपलब्ध असलेल्या उपकरणांपैकी एक म्हणजे फ्रीज. यात खाण्यापिण्याचे बरेच पदार्थ ठेवलेले असतात. जर बराचवेळ फ्रिजची व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर दुर्गंधी यायला सुरूवात होते. (Kitchen Cleaning Ideas) फ्रिजचे असे अनेक भाग असतात जे दुर्लक्ष केल्यानं महिनोंमहिने अस्वच्छ राहतात. फ्रिजच्या रबरमध्ये जमा झालेली घाण, बर्फ काढून व्यवस्थित स्वच्छता करावी लागते. काही सोप्या किचन ट्रिक्स तुमचं हे काम अधिक सोपं  करू शकतात. (How to Clean a Refrigerator)

फ्रिजच्या दाराचे रबर स्वच्छ करा

रेफ्रिजरेटरच्या दरवाज्याच्या रबरवर जमा झालेली घाण काढून टाकण्यसाठी एका वाटीत गरम पाणी, व्हिनेगर आणि लिक्विड डिश सोप घ्या. यात छोटा रुमाल किंवा टॉवेल बुडवा. कापड पिळून याच्या साहाय्यानं घाणेरडे रबर स्वच्छ करा. या प्रक्रियेने तुम्ही पूर्ण रबर स्वच्छ करू शकता.

दुर्गंध होईल दूर

फ्रिजमध्ये जर तुम्हाला दुर्गंधी जाणवत असेल तर एका भांड्यात चहा पावडर, बेकींग सोडा, व्हाईट व्हिनेगर घाला आणि त्यात पाणी मिसळा नंतर फ्रिजमध्ये ठेवा.  या उपायानं आपोआप फ्रिजमधील दुर्गंध दूर होईल.

बर्फ कसा काढायचा

फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा झाला असेल तर एक भांड्यात पाणी गरम करून  बर्फ जमा झालेल्या ठिकाणी ठेवा. १० मिनिटं ठेवल्यानंतर फ्रिज बंद करा.  थोड्या वेळानं फ्रिज उघडल्यानंतर  बर्फ सहज निघालेला दिसेल. तुम्हाला सुरी किंवा चमच्यानं बर्फ काढत बसावे लागणार नाही.

हेअर ड्रायरचा वापर

फ्रिजचे रबर जर सैल झाले असेल तर ते टाईट करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. काही मिनिटांसाठी गरम हवा त्यावर मारा. त्यानंतर तुम्हाला फ्रिजचं रबर टाईट झालेलं दिसेल.

डाग कसे घालवायचे

बरेच लोक फ्रिजमधलं सामान पूर्ण बाहेर न काढताच साफसफाई करतात. अशात फ्रिजचे काही भाग असेच अस्वच्छ राहतात. याच कारणामुळे साफ सफाई करताना आधी सामान बाहेर काढून मग साफसफाई सुरू करा. फ्रिजच्या दाराला बरेच डाग लागतात. फ्रिजवरचे डाग घालवण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगर वापरू शकता. एक कप पाण्यात 3 ते 4 चमचे पांढरे व्हिनेगर घालून आणि कापडाला लावून रेफ्रिजरेटरचा दरवाजा स्वच्छ करा.

Web Title: Kitchen Cleaning Ideas : How to Clean a Refrigerator What is best way to clean inside refrigerator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.