Join us  

किचन सिंक, खिडक्या, फरशी होईल चटकन स्वच्छ, फक्त डिश सोपऐवजी वापरा ४ गोष्टी, काही मिनिटात किचन चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2023 3:16 PM

Kitchen Cleaning Tips: Keep Your Kitchen Fresh & Sparkling : किचन साफ करणं अवघड काम, पण चिंता सोडा, किचनमधले या ४ वस्तूंचा वापर केल्यास लवकर होईल साफ..

किचनची (Kitchen) सफाई करताना महिलांचं कंबरडं मोडतं. महिलांचा अधिक वेळ हा किचनमध्येच जातो (Cleaning Tips). सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्हीवेळेसाठी विविध पदार्थ तयार करण्यात महिलांचा घाम गळतो. जेवण करताना किचनची फरशी, तेलाचे-फोडणीचे डाग यासह इतर कारणांमुळे किचन अधिक कळकट आणि चिकट होते.

काही वर्किंग वूमन्सला दररोज किचनची सफाई करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे किचनमधल्या फरशी किंवा इतर उपकरणांवर पडलेले डाग अधिक हट्टी होत जातात, व हे डाग सहसा साबण किंवा लिक्विड वॉशरने निघून जात नाही. जर आपल्याला किचन कमी वेळात-मेहनत न घेता स्वच्छ करायचं असेल तर, डिश सोप किंवा लिक्विड वॉशरचा वापर न करता काही किचनमधल्या वस्तूंचा वापर करा (Kitchen Cleanliness). या गोष्टींमुळे स्वयंपाकघर लवकर स्वच्छ होईल, शिवाय लवकर खराबही होणार नाही(Kitchen Cleaning Tips: Keep Your Kitchen Fresh & Sparkling).

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी नसून, किचन यासह विविध गोष्टी स्वच्छ करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. बेकिंग सोड्याच्या वापराने फरशीवरील तेलाचे-फोडणीचे डाग, फ्रिज यासह इतर चिकट झालेल्या गोष्टी स्वच्छ करता येऊ शकतात. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चिकट जागेवर लावून १० मिनिटानंतर स्वच्छ करा.

अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापराने किचनमधले हट्टी-चिकट डाग सहज स्वच्छ केले जाऊ शकतात. शिवाय याच्या वापराने किचन सिंक देखील स्वच्छ होऊ शकते. यामुळे किचन सिंक नव्यासारखे चमकेल.

लिंबू

लिंबाच्या रसाच्या वापराने अनेक कळकट-चिकट झालेल्या वस्तू स्वच्छ करता येऊ शकतात. आपण याच्या वापराने किचनच्या खिडक्यांवरील हट्टी डाग देखील काढू शकता.

१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

गरम पाणी

किचन साफ करताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने किचनच्या वस्तुंवरील हट्टी डाग सहज दूर होतील, शिवाय घासताना अधिक मेहनतही घ्यावी लागणार नाही.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया