काहींची सकाळ चहाशिवाय होत नाही. शिवाय सायंकाळीही चहा लागतोच (Kitchen Hacks). चहाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. चहा करण्यासाठी विशेष साहित्यांची गरज लागत नाही (Cleaning Tips). चहा करण्यासाठी लहान चहाचं भांडं आणि चहाची गाळणी लागते. पण सतत चहाच्या गाळणीचा वापर केल्याने ती खराब होते. चहाच्या गाळणीमध्ये लहान कण जमा होतात.
काळपट पडलेली चहाची गाळणीचा वापर करणे आपल्या नको वाटतं. काहीजण तर वर्षानुवर्ष गाळण्या बदलत नाहीत. पण गाळणीला आपण स्वच्छ करू शकता. जर घासून चहाची गाळणी स्वच्छ होत नसेल तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा. काही मिनिटात गाळणी स्वच्छ होईल(Kitchen Hacks 101: How to clean a tea strainer at home).
काळी बुरशी लागलेला कांदा खावा की फेकून द्यावा? आरोग्य बिघडते? नक्की खरं काय?
चहाची गाळणी स्वच्छ करण्याची ट्रिक
- चहाची गाळणी अनेकदा घासूनही स्वच्छ होत नाही. ती काळपट पडत जाते. चहाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी आपण एका ट्रिकचा वापर करून पाहू शकता.
गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..
- यासाठी सर्वात आधी गॅस हाय फ्लेमवर ठेवा. त्यावर चहाची गाळणी ठेवा. नंतर ब्रशने गाळणी घासा. यामुळे चहाच्या गाळणीमध्ये अडकलेली घाण निघेल.
- नंतर ब्रशला थोडे भांडी घासण्याचं साबण लावा. याने चहाची गाळणी घासून काढा. नंतर पाण्याने धुवा. यामुळे काही मिनिटात चहाची गाळणी स्वच्छ होईल. त्यात अडकलेली घाण अगदी काही मिनिटात निघेल. आपण या ट्रिक महिन्यातून एकदा चहाची गाळणी स्वच्छ करू शकता.