Lokmat Sakhi >Social Viral > कांदा-लसूण खाता, सालं फेकून देता? पहा त्यांचे 5 भन्नाट सोपे झटपट उपयोग

कांदा-लसूण खाता, सालं फेकून देता? पहा त्यांचे 5 भन्नाट सोपे झटपट उपयोग

How To Use Onion Garlic Peel: कांदा आणि लसूणाच्या साली कचरा म्हणून टाकून देण्याआधी त्यांचे हे काही उपयोग एकदा बघा, सौंदर्यापासून ते झाडांच्या खतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 06:03 PM2022-07-02T18:03:01+5:302022-07-02T18:14:11+5:30

How To Use Onion Garlic Peel: कांदा आणि लसूणाच्या साली कचरा म्हणून टाकून देण्याआधी त्यांचे हे काही उपयोग एकदा बघा, सौंदर्यापासून ते झाडांच्या खतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल.

Kitchen Hacks: Best use of Onion and Garlic peel, What to do with onion and garlic peel, Use of onion and garlic peel for hair | कांदा-लसूण खाता, सालं फेकून देता? पहा त्यांचे 5 भन्नाट सोपे झटपट उपयोग

कांदा-लसूण खाता, सालं फेकून देता? पहा त्यांचे 5 भन्नाट सोपे झटपट उपयोग

Highlightsकांदा- लसूणच्या साली कचऱ्यात टाकून देण्याआधी त्याचे हे काही उपयोग एकदा बघाच.

कांदा आणि लसूणाच्या सालींचा कचरा  (Onion Garlic Peel) बऱ्याचशा स्वयंपाक घरात अगदी रोजच निघतो. कारण या दोघांमुळे कोणत्याही पदार्थाला एक वेगळाच खमंगपणा येतो. त्यामुळे कधी लसूणाचा तरी वापर असतोच किंवा मग कांदा तरी टाकला जातोच. लसूण सोलायचा आणि सालं कचऱ्यात टाकायची, कांदा चिरायचा आणि त्याचीही सालं कचऱ्यात टाकायची, ही आपली नेहमीची सवय. पण या दोन्ही पदार्थांच्या सालांचे खूप चांगले उपयोग (Best use of Onion and Garlic peel) करता येतात. त्या दोघांमध्येही अनेक आरोग्यदायी, औषधी घटक असतात. त्यामुळे कांदा- लसूणच्या साली कचऱ्यात टाकून देण्याआधी त्याचे हे काही उपयोग एकदा बघाच. (What to do with onion and garlic peel)

 

लसूण आणि कांद्याच्या सालांचे उपयोग
१. केसांसाठी फायदेशीर

कांद्याच्या सालांमध्ये भरपूर प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन असते. या दोन्ही घटकांचा उपयोग केसांच्या चांगल्या वाढीसाठी होतो. त्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्या. त्यात कांद्याची सालं टाका. पाणी गॅसवर उकळायला ठेवा. पाणी उकळून साधारण २० ते २५ टक्के आटलं की गॅस बंद करा. हे पाणी कोमट झालं की शाम्पू केल्यानंतर ते केसांना लावा आणि त्याने केस धुवा. केसांना खूप चांगलं पोषण मिळेल.

 

२. स्वयंपाकासाठी वापर
पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत कधी कधी गरमागरम तूप-मीठ- भात खाण्याची इच्छा होते. किंवा आजारी माणसाला तोंडाला चव नसेल तर तूप- मीठ- भात दिला जातो. हा भात शिजवताना त्यात लसूणाच्या ३ ते ४ पाकळ्या सालं न काढताच टाकून द्या. भाताला लसूणाचा एक छान फ्लेवर येईल. साध्या वरणासोबतही हा लसूण फ्लेवर भात छान लागतो.

 

३. मसाला तयार करा
कांदा आणि लसूणाची सालं एकदा पाणी टाकून धुवून घ्या. म्हणजे ती स्वच्छ होतील. यानंतर तव्यावर किंवा कढईत टाकून ती चांगली भाजून घ्या आणि त्यातला ओलावा काढून टाका. भाजून पुर्णपणे कोरडी झाली की मग ती मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर तुमच्या रोजच्या तिखटात टाका. तिखटाला छान ओनियन- गार्लिक फ्लेवर येईल. किंवा पापड, भाजलेला ब्रेड, सॅण्डविज यावरही ही पावडर टाकून खाता येते.

 

४. झाडांसाठी खत
कांद्याची सालं झाडांसाठी एक उत्तम खत आहेत. कारण त्यामध्ये असलेले सल्फर आणि नायट्रोजन झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. यासाठी कांद्याची सालं पाण्यात भिजत ठेवा. ८ ते १० तास पाण्यात भिजल्यानंतर ती पाण्यातून काढून टाका आणि हे पाणी झाडांना द्या. झाडांची वाढ तर जोमाने होईलच, पण फुलांचाही बहर येईल. 

 

५. तळपायांसाठी उपयुक्त
ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना तळपायाला नेहमी खाज येते. कधीकधी ही तळपायांची खाज अगदीच असह्य होते. हा त्रास कमी करण्यासाठी कांदा आणि लसूणाची सालं उपयुक्त ठरतात. यासाठी कांदा आणि लसूणाची सालं एका भांड्यात पाणी टाकून उकळा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात मीठ टाका. हे पाणी गरम असतानाच त्यात बुडवून ठेवा. १० ते १५ मिनिटे झाल्यावर पाय पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तळपायांची खाज तर कमी होईलच पण पायाची त्वचा मऊ आणि स्वच्छ झाल्यासारखीही वाटेल. 

 

Web Title: Kitchen Hacks: Best use of Onion and Garlic peel, What to do with onion and garlic peel, Use of onion and garlic peel for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.