Join us  

तव्याचा खालचा भाग कळकट्ट झालाय? १ सोपी ट्रिक, काळपट तवा चमकेल नव्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 10:45 AM

Kitchen Hacks Cleaning tips How To Clean Tawa or Pan : मग हा तवा साफ करण्यासाठी नेमकं काय करायचं, पाहूया...

तवा ही आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या रोज वापरली जाणारी गोष्ट. पोळी, भाकरी, पराठे, डोसे असे करण्यासाठी आपल्याकडे लोखंडाचा, नॉन स्टीक आणि आणखी एखादा असे किमान २ किंवा ३ तवे तरी असतातच. आपण रोज हे तवे वापरतो आणि घासायला टाकतो किंवा स्वत: घासून टाकतो. पुढच्या बाजुने आपण तवा स्वच्छ घासतो. पण मागच्या म्हणजेच खायल्या बाजुने आपण तो तितका नीट घासत नाही. खालची बाजू गॅसवर असल्याने किंवा कधी तेल खाली निथळल्याने हा तवा खालच्या बाजूने कळकट्ट आणि चिकट व्हायला लागतो (Kitchen Hacks Cleaning tips How To Clean Tawa or Pan). 

(Image : Google)

एकदा हा थर तव्यावर साठत गेला की मग तो निघणे अवघड होऊन जाते. अशावेळी आपण घासणीने कितीही घासलं तरी हा चिकटपणा निघत नाही. पण तो काढला नाही तर आपल्यालाही अस्वस्थ होत राहतं आणि त्याच तव्यावर आपल्याला नेहमी काही ना काही करायचं असल्याने आपण तो असा अस्वच्छ ठेवू शकत नाही. मग हा तवा साफ करण्यासाठी नेमकं काय करायचं. तर आज आपण अशीच एक सोपी ट्रीक पाहणार आहोत जी वापरुन तवा मागच्या बाजुनेही चकचकीत होऊ शकेल. घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन अगदी काही मिनीटांत हे काम होणार असल्याने ही ट्रीक नेमकी काय आहे ते समजून घेऊया...

१. सगळ्यात आधी तवा उलटा ठेवून त्यावर चिमटीने मीठ आणि बेकींग पावडर घालायची. 

२. त्यावर सगळीकडे लिक्विड सोप घालायचा आणि हे मिश्रण सगळीकडे नीट लागेल असे पसरवायचे.

३. यावर तवा नीट झाकला जाईल अशा पद्धतीने सगळीकडून टिश्यू पेपर घालून ठेवायचे. 

४. या पेपरवरुन व्हाईट व्हिनेगर घालून काही वेळ हे असेच ठेवायचे.  

५. त्यानंतर हे टिश्यू पेपर काढायचे, ते काढतानाच तव्याचा काळेपणा निघून आल्याचे दिसते. 

६. तवा एकाएकी मागच्या बाजुनेही चकचकीत दिसायला लागल्याने आपल्यालाही छान वाटते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स