Lokmat Sakhi >Social Viral > Kitchen Hacks :  कुकरचं रबर सैल झालं असेल तर 5 ट्रिक्स वापरा; झाकण लागेल घट्ट शिट्याही होतील पटपट

Kitchen Hacks :  कुकरचं रबर सैल झालं असेल तर 5 ट्रिक्स वापरा; झाकण लागेल घट्ट शिट्याही होतील पटपट

Kitchen Hacks : काहीवेळा कुकरचे रबर इतके सैल होते की ते कुकरच्या झाकणावर चिकटत नाही आणि बाहेर सरकते. अशा स्थितीत ते फेकण्याऐवजी 10 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि नंतर लावा. ((How to fix loose pressure cooker rubber)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:31 AM2022-05-22T11:31:48+5:302022-05-22T11:50:21+5:30

Kitchen Hacks : काहीवेळा कुकरचे रबर इतके सैल होते की ते कुकरच्या झाकणावर चिकटत नाही आणि बाहेर सरकते. अशा स्थितीत ते फेकण्याऐवजी 10 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि नंतर लावा. ((How to fix loose pressure cooker rubber)

Kitchen Hacks : Cooker Rubber Loose, follow these tips and tricks to make it tighter | Kitchen Hacks :  कुकरचं रबर सैल झालं असेल तर 5 ट्रिक्स वापरा; झाकण लागेल घट्ट शिट्याही होतील पटपट

Kitchen Hacks :  कुकरचं रबर सैल झालं असेल तर 5 ट्रिक्स वापरा; झाकण लागेल घट्ट शिट्याही होतील पटपट

प्रेशर कुकर जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जातो. यामुळे काम सोपे होते. यामुळे केवळ स्वयंपाकाचा वेळच वाचत नाही तर जेवण अधिक चवदार आणि चविष्ट होते. (Kitchen Tips and Hacks)  प्रेशर कुकरमध्ये अन्न पूर्णपणे शिजवण्यासाठी देखील कमी वेळ लागतो बहुतेक स्त्रिया दररोज वापरतात. मात्र सततच्या वापरामुळे त्यात काही समस्या येऊ लागतात. बहुतेक स्त्रियांना त्रास देणारी एक समस्या म्हणजे कुकरचे रबर  खूप लवकर सैल होते.(Cooker Rubber Loose, follow these tips and tricks to make it tighter)

त्यामुळे कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही आणि स्वयंपाक करताना अडचणी येतात. त्याच वेळी, कुकरमधून पाणी गळण्याची भीती देखील  असते. कारण यामुळे अपघात देखील होऊ शकतो. म्हणून आम्ही अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रेशर कुकरचे सैल रबर घट्ट करून त्याचा सहज वापर करू शकता. तसेच, या टिप्सचा अवलंब केल्याने रबर बराच काळ व्यवस्थित राहील. (How to fix loose pressure cooker rubber)

फ्रिजरमध्ये ठेवा

काहीवेळा कुकरचे रबर इतके सैल होते की ते कुकरच्या झाकणावर चिकटत नाही आणि बाहेर सरकते. अशा स्थितीत ते फेकण्याऐवजी 10 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि नंतर लावा. यामुळे तुम्हाला नवीन रबर खरेदी करण्याचीही गरज भासणार नाही.

थंड पाण्याचा वापर

रबर सैल वाटत असेल तर झाकण काढून लगेच थंड पाण्याने धुवावे. असे केल्याने रबर थोडे घट्ट होईल आणि कुकरमध्ये सहज दाब निर्माण होईल. पण तुम्हाला फ्लेम जास्त ठेवावी लागेल आणि थोडावेळ झाकण ठेवावे लागेल.

 घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

पीठ लावा

कुकरला १० मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवायला वेळ नसेल तर कणकेचा गोळा घेऊन झाकणाभोवती लावा. नंतर कुकरचे झाकण ठेवा. पण यातही प्रेशर वाढेपर्यंत कुकरचे झाकण धरून ठेवावे लागेल. हा उपाय तात्पुरता आहे.

टेप

कुकरचे सैल रबर घट्ट करण्यासाठी, त्याच्या दोन्ही बाजूंना टेप लावा. यामुळे रबर घट्ट होईल आणि तुम्ही ते सहजपणे झाकणावर ठेवू शकता आणि कुकरमध्ये दबाव निर्माण करू शकता. कधी-कधी कुकरचा रबर खूप सैल होतो आणि नवीन घ्यायला बाजारात जायला वेळच मिळत नाही. अशावेळी मध्यभागी रबर कापून अतिरिक्त भाग काढून टाका. नंतर सुई आणि धाग्याच्या साहाय्याने ते जोडा आणि वर  टेप लावा जेणेकरून ते थोडे अधिक मजबूत होईल.

इंजिनिअर सुनेची चपाती बनवण्याची स्टाईल पाहून सासूनं कपाळावरच हात मारला; पाहा व्हायरल व्हिडिओ

हा तात्पुरता जुगाड आहे. वेळ मिळेल तेव्हा नवीन रबर खरेदी करा. अनेकदा अनेक स्त्रिया कुकर न धुता काहीतरी बनवतात, यामुळे अनेकवेळा भाजीचे कण कुकरच्या रबराला चिकटतात. त्यामुळे रबर खराब होण्याची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी प्रत्येक वापरानंतर कुकर आणि त्याचे रबर धुणे आवश्यक आहे.

झाकण सरळ ठेवा

तुम्हीही कुकरचे झाकण सरळ ठेवले नाही तर रबरावर दाब पडू लागतो. यामुळे रबर लवकर खराब  होण्याचा धोका असतो. त्यामुळे ते वापरल्यानंतर कुकर आणि त्याचे झाकण धुवून ठेवा. कुकरचे रबर धुण्यासाठी कधीही डिशवॉशर वापरू नका. डिशवॉशरमध्ये ठेवल्याने रबर लवकर सैल होऊ शकतो. कुकरचे रबर नेहमी स्वच्छ ठेवा. ते नेहमी साबण आणि पाण्याने धुवा आणि हवेत कोरडे करा. 
 

Web Title: Kitchen Hacks : Cooker Rubber Loose, follow these tips and tricks to make it tighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.