Lokmat Sakhi >Social Viral > लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

Simple Hacks For Lighter: लायटरमुळे गॅस शेगडी (gas stove) पेटतच नसेल तर आपण ते फेकून देतो. पण असं करण्याआधी एकदा हे काही सोपे उपाय ( 2 simple solutions) करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 01:08 PM2022-12-24T13:08:28+5:302022-12-24T13:09:52+5:30

Simple Hacks For Lighter: लायटरमुळे गॅस शेगडी (gas stove) पेटतच नसेल तर आपण ते फेकून देतो. पण असं करण्याआधी एकदा हे काही सोपे उपाय ( 2 simple solutions) करून बघा.

Kitchen Hacks: Do not throw the gas lighter immediately if it does not ignite. try 2 simple solutions | लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

Highlightsएखादं गॅस लायटर कमीतकमी एक वर्ष तरी चाललंच पाहिजे. जर त्याआधीच ते खराब होत असेल तर लायटर वापरताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे...

गॅस शेगडी पेटविण्यासाठी लागणारं लायटर ही प्रत्येक स्वयंपाक घरातली (Kitchen Hacks) एक अत्यावश्यक वस्तू. त्यामुळे घर श्रीमंताचं असो किंवा गरीबाचं.. प्रत्येक घरात लायटर असतंच. पण बऱ्याचदा आपण लायटर (gas lighter) वापरण्यात कळत नकळत काही चुका करतो. त्यामुळे मग लाईटरचं आयुष्य कमी होतं आणि ते लवकर खराब होतं. एखादं गॅस लायटर कमीतकमी एक वर्ष तरी चाललंच पाहिजे. जर त्याआधीच ते खराब होत असेल तर लायटर वापरताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे...(Simple Hacks For Gas Lighter) 

लायटर वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा...
१. स्वयंपाक घरात काम करताना प्रत्येकीच्या मागे खूप गडबड असते. त्यामुळे गडबडीत मग आपण गॅस शेगडी पेटवतो आणि लायटर ओट्यावर तिथेच कुठेतरी ठेवून देतो. कधी त्याठिकाणी पाणी सांडलेले असते. किंवा भाज्यांची ओली साले पडलेली असतात. या ओलाव्यामुळे लायटर खराब होतं. त्यामुळे शक्य तो लायटर हे काेरड्या जागी ठेवा.

सायटिकाच्या त्रासामुळे वैतागलात? फक्त ५ मिनिटांचा वेळ काढून करा ३ सोपे व्यायाम- मिळेल आराम

२. लायटर आडवं ठेवण्यापेक्षा ते नेहमी उभं करून ठेवावं. यासाठी लायटर सोबत जे स्टॅण्ड दिलं जातं, त्याचा वापर अवश्य करावा. लायटर उभं ठेवण्याच्या सवयीमुळे ते नक्कीच अधिककाळ टिकण्यास मदत होते.

 

खराब झालेलं लायटर दुरूस्त कसं करायचं?
१. बऱ्याचदा असं होतं की लायटरचं मागचं बटन जेव्हा आपण दाबतो तेव्हा त्यातून आवाज तर येतो.

चष्म्याच्या काचेवर चरे पडतात, लवकर खराब होतो? ४ टिप्स, चष्मा राहील स्वच्छ- चकचकीत

पण गॅस पेटत नाही. असं झालं तर ते लायटर सलग २ ते ३ दिवस कडक उन्हामध्ये ठेवा. यामुळे लायटरच्या आतलं मॉईश्चर कमी होतं आणि ते पुन्हा पहिल्यासारखं चालू लागतं.

 

२. हा दुसरा उपाय इन्स्टाग्रामच्या seemassmartkitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा आपलं काम संपतं आणि आपण गॅस शेगडी बंद करतो तेव्हा त्या गरम झालेल्या गॅस शेगडीमध्ये लायटर उभं राहील अशा पद्धतीने अडकवून ठेवा. रात्रभर किंवा ७ ते ८ तास ते तशाच अवस्थेत असावं.

 

Web Title: Kitchen Hacks: Do not throw the gas lighter immediately if it does not ignite. try 2 simple solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.