उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात धान्यात, पिठात किडे व्हायला सुरूवात होते. धान्य साठवून ठेवणं मोठी समस्या ठरते. अनेकदा आपल्याला पीठ फेकूनही द्यावं लागतं. (Kitchen Hacks) जर पीठ योग्य पद्धतीनं साठवलं नाही तर पोरकीडे, अळ्या होतात. पीठ योग्य पद्धतीनं साठवण्याच्या ट्रिक्स वापरल्या तर धान्य वर्षानुवर्ष चांगले रहू शकते. (Easy ways prevent wheat bugs beetles using salt)
मीठाचा वापर
धान्य, पीठ खराब होऊ नये यासाठी त्यात समुद्री मिठाचे खडे मिसळा. जर तुमच्याकडे २० किलो पीठ असेल तर ८ ते १० चमचे मीठ मिसळू शकता. मीठ मिसळल्यानं किडे लागत नाहीत. पीट साठवून ठेवण्यसाठी एका मोठ्या भांड्यात पीठ घालून त्यात मीठ मिसळा आणि पुन्हा पीठ घाला. या उपायानं दीर्घकाळ पीठ चांगलं राहील.
स्टिलच्या डब्यात ठेवा
पीठ जास्त काळ साठवून ठेवत असताना ते प्लास्टिक पिशवीत असू नये याची विशेष काळजी घ्या. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पीठ ठेवल्यास त्यात ओलावा येऊ लागतो आणि त्यामुळे ते लवकर खराब होते. म्हणून, पीठ जास्त काळ साठवण्यासाठी, ते पूर्णपणे स्वच्छ करून कोरडे केल्यानंतरच ते स्टीलच्या डब्यात साठवावे.
सुकी मिरची आणि तेजपत्ता
जर तुम्हाला पिठात मीठ घालायचे नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुक्या मिरच्या आणि तमालपत्र वापरू शकता. त्यासाठी त्यात 10 ते 15 सुक्या मिरच्या आणि तमालपत्र घाला. दोन्ही पदार्थ मिक्स करताना लक्षात ठेवा की मिरच्या पिठात मिसळू नयेत. या टिप्सने पिठात पोरकिडे होणार नाही.
फ्रिजमध्ये ठेवा
पीठ ४ ते ५ महिने साठवायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. यासाठी पीठ लहान बॉक्समध्ये स्थानांतरित करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने पीठ लवकर खराब होणार नाही. जास्त दिवसांसाठी कुठेही बाहेर जात असाल तर पीठ एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पीठ खराब होणार नाही.
इतर टिप्स
१) धान्य खराब होऊ नये म्हणून आधी उन्हात ठेवा नंतर डब्यात साठवा.
२) धान्यात तुम्ही कडूलिंबाची पानं घालून ठेवल्यास ते चांगले राहील.
३) गव्हाच्या आणि तांदळाच्या पीठात लवंग, तमालपत्र घालून ठेवल्यानं पीठ चांगले राहते.