स्वयंपाक घरात चाकू- विळी असणं जसं गरजेचं असतं तसंच सालकाढे किंवा साेलाणी (How to sharpen knife or vegetable peeler) असणंही आवश्यक आहे. आपली कामं सोपी आणि फटाफट करणाऱ्या या काही गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांची धार गेली असेल किंवा त्या बोथट झाल्या असतील, तर मग नकळतपणे आपलाही कामाचा वेग मंदावतो आणि मग कामं लांबत जातात. म्हणूनच या सगळ्याच वस्तू चांगल्या अवस्थेत असणं गरजेचं आहे. फळ, भाज्या किंवा गाजर- काकडी यासारखं सलाड यांची सालं काढायचं काम वारंवार असतंच. त्यामुळेच सोलाणीला (vegetable peeler) जर धार लावायची असेल, तर त्यासाठी या काही टिप्स (kitchen tips and tricks) वापरून बघा.
सोलाणीला धार लावण्यासाठी ३ टिप्स...१. मीठाचं पाणीहा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. धार कमी झाली असेल तरच हा उपाय करावा असं काही नाही. तुमच्या सोलाणीची जर नेहमीच अशा पद्धतीने काळजी घेतली तर ती अधिक काळ टिकेल. त्यामुळे वापर झाल्यानंतर नेहमीच साेलाणी किंवा सालकाढे धुण्यासाठी ही पद्धत वापरली तरी चालेल. हा उपाय करण्यासाठी पाणी गरम करून घ्या. त्या पाण्यात मीठ टाका. या मीठाच्या पाण्यात काही वेळ सालकाढे भिजत ठेवा. त्यानंतर ते पाण्यातून काढून स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या आणि नंतर एखाद्या तासासाठी उन्हात ठेवा. धार चांगली राहील.
२. सॅण्डपेपरचाकुला किंवा विळीला धार लावण्यासाठी ज्याप्रमाणे सॅण्डपेपरचा वापर करता येतो, तसाच सालकाढ्याला धार लावण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. घराजवळच्या कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात सॅण्डपेपर अगदी स्वस्तात मिळतो. सॅण्डपेपरचा एखादा छोटासा तुकडा तुमच्याकडे असेल तरीही चालतो. सगळ्यात आधी सोलाणी थोडी ओलसर करून घ्या. त्यानंतर सॅण्डपेपरचा तुकडा सोलाणीच्यामध्ये घाला आणि तिच्या दोन्ही टोकांवर घासून त्याला धार लावा.
३. सहानदेवघरात चंदनाचे खोड उगाळण्यासाठी सहान असते. या सहानीचा उपायोग करूनही सोलाणीला धार लावता येते. यासाठी सहानीच्या टोकावर सोलाणी घासा. ५ ते ७ मिनिटे घासल्यास सोलाणी चांगली धारदार होईल.