भारतात जवळपास प्रत्येक घरांमध्ये डाळ - तांदुळाचा वापर होतो (Bugs and Worms). रोजच्या जेवणात डाळ- भात हमखास असतोच. अनेक जण महिनाभर पुरेल इतकं धान्य घरात साठवून ठेवतात (Kitchen Hacks). तर काही जण ६ महिने किंवा वर्षभर पुरेल इतकं घरात धान्य साठवून ठेवतात (Rice). डाळी आणि तांदुळाला बऱ्याचदा ओलसर हात लागतात. ओलसरपणामुळे धान्यात किडे- अळ्या होतात. असे अस्वच्छ झालेले डाळ- तांदूळ मग खावेसेही वाटत नाहीत.
शिवाय कीड लागल्याने स्वच्छ करणंही कठीण जातं. किड साफ करणे थोडे मेहनतीचे काम आहे. कीड लागलेली डाळी हळू हळू खराब होते. जर डाळ किंवा तांदळाला कीड लागली तर ती सहज साफ करण्यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करून पाहा. डाळी - तांदुळाला कीड लागणार नाही. शिवाय वर्षभर आरामात टिकेल(Kitchen hacks: Keep bugs away from rice with these simple tips).
डाळी - तांदुळला कीड लागू नये म्हणून..
केस होतील काळेभोर, फक्त मेहेंदीत '१' सिक्रेट पावडर मिसळा- केस गळतीही थांबेल..
डाळी - तांदुळला कीड लागू नये म्हणून, आपण तमालपत्र आणि लवंगाचा वापर करू शकता. लवंग आणि तमालपत्राचा वापर केल्याने डाळ - तांदुळाच्या डब्यात किडे होणार नाही.
यासाठी तांदुळाचा डबा स्वच्छ असावा. त्यात तांदूळ साठवताना तमालपत्र घाला. आपण त्यात ४ ते ५ तमालपत्र घालू शकता. तमालपत्राच्या उग्र गंधामुळे डब्यासभोवती कीड फिरकणार नाही.
सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..
डाळीला कीड लागू नये म्हणून, आपण डाळीच्या डब्यात लवंगा ठेऊ शकता. लवंगाचा गंधही उग्र असतो. यामुळे डाळीच्या डब्यात किडे येत नाही.
हळकुंडाचा वापर
डाळ तांदुळाला कीड लागल्यास ते साफ करण्यासाठी, आपण हळकुंडाचा वापर करू शकता. हळदीचा गंध तीव्र असतो ज्यामुळे डाळीतून कीड निघून जाते. काही हळकुंड एका सुती कापडात ठेऊन गाठ बांधा, आणि डब्यात ठेवा. यामुळे डाळ - तांदुळा कीड लागणार नाही.