Join us  

Kitchen Tips and Tricks : झाकण एकदा घट्ट लागलं की उघडत नाही? ४ सोप्या ट्रिक्स, चुटकीसरशी कोणतंही झाकण उघडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 6:37 PM

Kitchen Tips and Tricks : स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या अनेक बरण्यांची  झाकणं कधी कधी वाकडी तिकडी लावल्यानं उघडायला बराच वेळ जातो तर कधी बोटंसुद्धा दुखायला लागतात.

रोजच्या वापरातले असे अनेक डबे, बरण्या उघडताना कधी कधी नाकीनऊ येतात. स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या अनेक बरण्यांची  झाकणं कधी कधी वाकडी तिकडी लावल्यानं उघडायला बराच वेळ जातो तर कधी बोटंसुद्धा दुखायला लागतात. हे अनेक कारणांमुळे घडते. कधी बराचवेळ प्रयत्न करूनही झाकण उघडत नाही. (Easy Kitchen Tips and Tricks) अशा स्थितीत तुम्हाला कामासाठी उशीरही होतोच वरून झाकण उघडायचं कसं याचही टेंशन असतं. 

सहसा स्त्रिया अशा स्थितीत दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतात. त्याऐवजी तुम्ही काही ट्रिक्स वापरल्या तर  झाकण उघडण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही झाकणावर तुमची पकड घट्ट केली आणि  घट्टपणा कमी करण्यासाठी उपाय केले, तर त्यामुळे जारचे झाकण उघडणे सोपे होईल. (know about some tricks to open stubburn jar)

रबर ग्लोव्हजची मदत घ्या

जर तुमच्या हाताला किंवा बरणीवर तेल, तूप वगैरे लागले असेल आणि त्यामुळे बरणीचे झाकण उघडण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही रबरच्या हातमोज्यांची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या  हातमोजे घाला. हे तुम्हाला जारच्या झाकणावर अधिक पकड देईल. यामुळे ते फिरवणे आणि उघडणे खूप सोपे होईल.

गरम पाणी

गरम पाणी घट्ट बरणीचे झाकण काढण्यास देखील मदत करू शकते. बरणीचे झाकण बराच वेळ लक्ष न दिल्याने घट्ट झाले असेल किंवा जार एकदम नवीन असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच उघडत असाल तर ही पद्धत विशेषतः उपयुक्त आहे. तुम्हाला फक्त जारचे झाकण भाग गरम वाहत्या पाण्याखाली सुमारे 30 सेकंद ठेवावे लागेल. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा उष्णतेमुळे झाकण किंचित वाकेल, ज्यामुळे सील सैल होईल. झाकण काढण्यासाठी, त्याला थोडेसे वळण द्या जेणेकरून झाकण सहज उघडेल. हे करताना स्वत:च्या  हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या.

झाकणावर चमचा मारा

ही देखील एक पद्धत आहे, जी झाकण उघडण्यास मदत करते. जर डब्याचे झाकण जाम झाले असेल तर चमच्याने हलकेच टॅप करा. कधीकधी झाकणाजवळ अन्न अडकते आणि ते उघडणे कठीण होते. चमच्याने डब्याच्या झाकणावर टॅप केल्यानं त्यातून अन्न बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.

सर्व पद्धतींचा अवलंब करूनही बरणीचे झाकण उघडता येत नसेल, तर ओपनरची मदत घेता येईल. तुम्हाला फक्त ओपनर बरणीच्या झाकणावर ठेवावे लागेल आणि नंतर थोड्या दाबाने झाकण उघडावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही काही सेकंदात बरणीचे झाकण उघडू शकता. यावेळी तुम्हाला काही गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतील. या पद्धतीचा अवलंब केल्याने कदाचित झाकण खराब होईल आणि आपण ते पुन्हा वापरू वापरण्यायोग्य राहणार नाही.

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.