आपल्या किचनमधील काही पदार्थ असे असतात की जे आपल्याला दररोजच्या स्वयंपाकात उपयोगी येत नाहीत. असे पदार्थ कधीतरी वापरले जातात परंतु कधीतरी लागणाऱ्या या वस्तूंना स्टोअर करून कसे ठेवावे हा प्रश्न सगळ्याचा गृहिणींना पडतो. हे कधीतरी लागणारे पदार्थ व्यवस्थित स्टोअर करून ठेवले नाहीतर त्यांना किड किंवा अळ्या लागून ते खराब होण्याची शक्यता असते. सगळे किचन एका गृहिणीने सांभाळणे अजिबात सोपे काम नाही.
किचनमधील उपकरणांची वेळोवेळी स्वच्छता करावी लागते. तसेच काही पदार्थ व्यवस्थित काळजी घेऊन स्टोअर करावे लागतात. उरलेल्या पदार्थांपासून एखादा नवीन झटपट पदार्थ तयार करून सगळ्यांना खाऊ घालू शकतो. अशाप्रकारे अन्न वाया जाऊ न देणे, किचनची स्वच्छता ठेवणे, पदार्थ नीट स्टोअर करून ठेवणे यांसारख्या नानाविध गोष्टींकडे गृहिणींना लक्ष ठेवावे लागते. पण आता चिंता करू नका. काही खास किचन टीप्स वापरून आपण आपल्या किचनमधील इतर गोष्टी सहजपणे हाताळू शकता. या किचन टीप्स वापरून आपण नक्की काय काय करू शकतो, हे शिकून घेऊयात(Kitchen Tips).
नक्की काय काय करता येऊ शकत ?
१. बदाम बऱ्याच काळासाठी स्टोअर करून ठेवायचे असल्यास ते एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून त्यात १ टेबलस्पून साखर घालावी. यामुळे बदाम खराब न होता, किंवा त्यांना किड न लागता चांगले टिकून राहतात.
२. सँडविच बनवताना आपण ब्रेड स्लाइसच्या बाहेरच्या कडा कापून घेतो. या कापून घेतलेल्या कडा फेकून न देता त्या गरम तव्यावर थोड्या भाजून घ्याव्यात. भाजून झाल्यानंतर थोड्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. या तयार झालेल्या बारीक पावडरीस 'ब्रेड स्क्रम्स' असे म्हणतात. हे ब्रेड स्क्रम्स आपण हवाबंद डब्यांत भरून रेफ्रिजरेट करून ठेवू शकतो. कटलेट्स, पॅटिस बनवताना या ब्रेड स्क्रम्सचा वापर केल्यास ते कुरकुरीत, खमंग होण्यास मदत होते.
३. बाजारांतून बटाटे विकत आणल्यास त्यातील काही बटाट्यांची चव ही गोड असते, किंवा बाजारात गोड बटाटे देखील विकत मिळतात. चवीला गोड असणारे हे बटाटे भाजीत वैगेरे वापरल्यास भाजी गोड होते. यामुळे भाजी खायची मज्जा निघून जाते. अशावेळी एका भांड्यात थोडे कोमट पाणी घेऊन त्यात थोडे मीठ घालून ते मीठ व्यवस्थित विरघळवून घ्यावे. नंतर या मिठाच्या पाण्यांत काही काळासाठी हे बटाटे बुडवून ठेवावे. यामुळे या बटाट्यातील गोडवा कमी होतो.
momandthebeauty या इंस्टाग्राम पेजवरून किचन सहजरित्या सांभाळण्यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टीप्स दिल्या आहेत, त्या समजून घेऊयात.
४. जर फ्रिजमध्ये कुबट किंवा खराब वास येत असेल. अशावेळी फ्रिज कितीही वेळा साफ करून हा कुबट वास जाता जात नाही. अशा वेळी एक सोपा उपाय करून आपण हा फ्रिजमधील कुबट वास घालवू शकतो. वर्तमान पत्राच एक मोठं पान घेऊयात त्यावर किंचित पाणी शिंपडावे. पाणी शिंपडून झाल्यानंतर या पेपराला चुरून त्याचा एक गोळा तयार करा. हा पेपराचा गोळा फ्रिजमध्ये मध्यभागी किमान ७ ते ८ तासांसाठी ठेवून द्या. ७ ते ८ तासांनंतर हा गोळा काढून फेकून द्यावं. फ्रिजमधील कुबट, खराब वास बऱ्यापैकी कमी झाला असेल.
५. ओवा जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी तो गरम तव्यावर थोडा भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर थोडा गार झाल्यावर तो एका हवाबंद डब्यांत भरून ठेवा. हवाबंद डब्यांत ओवा भरून ठेवताना त्यात एक टेबलस्पून सैंधव मीठ घालून मिक्स करून ठेवून द्या. ओवा खराब न होता किंवा त्याला किड न लागता तो बराच काळ आहे तसाच टिकून राहतो.