Lokmat Sakhi >Social Viral > किती भांडी असूदे  २ मिनिटात धुवून चकाचक होतील; 3  ट्रिक्स; किचनचं काम होईल झटपट, सोपं

किती भांडी असूदे  २ मिनिटात धुवून चकाचक होतील; 3  ट्रिक्स; किचनचं काम होईल झटपट, सोपं

Kitchen Tips & Hacks : जर कोणी मदत करणारं नसेल तर काम खूपच  हेक्टीक वाटतं.  काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही पटापट भांडी स्वच्छ करू शकता. (Kitchen Hacks and Tips)

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 06:12 PM2022-11-18T18:12:25+5:302022-11-18T18:18:11+5:30

Kitchen Tips & Hacks : जर कोणी मदत करणारं नसेल तर काम खूपच  हेक्टीक वाटतं.  काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही पटापट भांडी स्वच्छ करू शकता. (Kitchen Hacks and Tips)

Kitchen Tips & Hacks : How to wash utensils in winter | किती भांडी असूदे  २ मिनिटात धुवून चकाचक होतील; 3  ट्रिक्स; किचनचं काम होईल झटपट, सोपं

किती भांडी असूदे  २ मिनिटात धुवून चकाचक होतील; 3  ट्रिक्स; किचनचं काम होईल झटपट, सोपं

भांडी घासणं हा रोजच्या कामाचा भाग आहे. पण थंडीत पाण्यात हात टाकायचा म्हटलं की नको वाटतं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर भांडी घासणं खूपच कंटाळवाणं वाटतं.  ( How to wash utensils in winter)अशा स्थितीत खरकटी भांडी धुण्यासाठी मनाची तयारी करावी लागते. जर कोणी मदत करणारं नसेल तर काम खूपच  हेक्टीक वाटतं.  काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही पटापट भांडी स्वच्छ करू शकता. (Kitchen Hacks and Tips)

सगळ्यात आधी हे काम करा

हिवाळा असो किंवा उन्हाळा भांडी धुण्याआधी ग्लोव्हज घालण्याची सवय ठेवा जेणेकरून तुमचे हात खराब होणार नाही आणि थंडीही वाजणार नाही. ग्लोव्हज तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतील. जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता. 

गरम पाण्याचा वापर

जेवण बनवताना वापरलेल्या अनेक भांड्यांवर हट्टी डाग असतात. तर काहीवेळा खाद्यपदार्थांचा वास पदार्थांना येत असतो. म्हणूनच खरकटी भांडी गरम पाण्यात भिजवून  ठेवा. त्यानंतर साबण लावून स्वच्छ धुवा. 

मीठाचा वापर

जळलेली भांडी स्वच्छ करण्यात बराच वेळही जातो. अशावेळी आपण भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ वापरू शकता. होय, जळलेली मीठाने स्वच्छ करणे खूप सोपे आहे. भांड्यातून जळलेला भाग साफ ​​करण्यासाठी मीठ हे सर्वात प्रभावी घटकांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. यासाठी स्क्रब पॅडवर पुरेसे मीठ घ्या आणि डिश वॉशने स्वच्छ करा. मीठ क्लिनिंग एजंट म्हणून प्रभावीपणे कार्य करते आणि काहीमिनिटांत जळलेली भांडी साफ करते.

१) प्रथम, सिंक ड्रेन बंद करा. यानंतर सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा टाका.

२) आता भांड्यांवर 2 कप व्हिनेगर घाला.

३) आता 1 कप हायड्रोजन पेरॉक्साइड घ्या आणि एक लिंबू कापून सिंकमध्ये ठेवा.

४) सर्व भांडी ठेवल्यानंतर, सिंक पाण्याने भरा.

५) भिजण्यासाठी भांडी 15 मिनिटे पाण्यात ठेवा.

६) नंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवा.

Web Title: Kitchen Tips & Hacks : How to wash utensils in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.