Lokmat Sakhi >Social Viral > Kitchen Tips : गॅस सिलिंडर लावताना लक्षात ठेवाव्या, न चुकता कराव्या अशा 5 गोष्टी, काळजी घ्या

Kitchen Tips : गॅस सिलिंडर लावताना लक्षात ठेवाव्या, न चुकता कराव्या अशा 5 गोष्टी, काळजी घ्या

Kitchen Tips : साधारणपणे महिलांचा स्वयंपाकघरातील वावर जास्त असल्याने त्यांना आणि घरातील सर्वांनाच याबाबत खबरदारी घेण्याविषयी माहिती असायला हवी. पाहूयात गॅस सिलिंडरबाबत माहित असायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 11:41 AM2022-03-13T11:41:57+5:302022-03-13T11:57:29+5:30

Kitchen Tips : साधारणपणे महिलांचा स्वयंपाकघरातील वावर जास्त असल्याने त्यांना आणि घरातील सर्वांनाच याबाबत खबरदारी घेण्याविषयी माहिती असायला हवी. पाहूयात गॅस सिलिंडरबाबत माहित असायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी...

Kitchen Tips: Here are 5 things to keep in mind when installing a gas cylinder | Kitchen Tips : गॅस सिलिंडर लावताना लक्षात ठेवाव्या, न चुकता कराव्या अशा 5 गोष्टी, काळजी घ्या

Kitchen Tips : गॅस सिलिंडर लावताना लक्षात ठेवाव्या, न चुकता कराव्या अशा 5 गोष्टी, काळजी घ्या

Highlightsठराविक कालावधीने शेगडी, पाईप, रेग्युलेटर यांची तपासणी करुन घेणे महत्त्वाचेसिलिंडरमधून वास येतोय असे वाटल्यास तो बंद करुन मोकळ्या जागेत ठेवावा. तसेच याठिकाणच्या खिडक्या, दारे त्वरीत उघडावीत.

एलपीजी (LPG) म्हणजेच गॅस सिलिंडर (Gas cylinder) ही घरातील एक महत्त्वाची गोष्ट. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा हा गॅस जितका उपयुक्त तितकाच धोकादायकही. त्यामुळे गॅस सिलिंडर वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. अनेकदा आपण गॅस सिलिंडर नीट लावला नाही म्हणून स्फोट झाला किंवा गॅस लीक झाल्याने एखादा अपघात घडला असे ऐकतो. त्यानंतर होणारी हानी ही भरुन न काढता येणारी असते. अनेकदा हे अपघात जीवावर बेतणारे ठरु शकतात. त्यामुळे घरात गॅस सिलिंडर लावताना, काढताना, बदलताना योग्य ती काळजी घेऊन मगच करावे. साधारणपणे महिलांचा स्वयंपाकघरातील वावर जास्त असल्याने त्यांना आणि घरातील सर्वांनाच याबाबत खबरदारी घेण्याविषयी माहिती असायला हवी (Kitchen Tips) . पाहूयात गॅस सिलिंडरबाबत लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी... 

(Image : Google)
(Image : Google)

१. अनेकदा आपली सिलिंडरची जागा काहीशी अडचणीची असू शकते. पण तसे योग्य नाही. सिलिंडर ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी हवा थोडी खेळती असेल याची काळजी घ्यायला हवी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडर कोरडय़ा आणि थंड जागी ठेवावा. तसेच सिलिंडर शेगडी, स्टोव्ह, रॉकेल, तेल यांसारख्या गोष्टींजवळ असू नये. त्यामुळे अपघात घडल्यास पेट घेण्याची शक्यता जास्त असते. 

२. सिलिंडरमधून गॅस लिक होतोय असे वाटल्यास त्याचा वास येतो. अशावेळी त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेष म्हणजे अशावेळी घाबरुन जाण्याचीही गरज नाही. तर सरळ सिलिंडरचा नॉब बंद करावा. सिलिंडरकजून गॅसशेगडीकडे जाणारा पाईप कुठे तुटला नाही ना हे तपासावे. त्यानंतर रेग्युलेटर नीट बसला आहे ना याची घरातील इतर व्यक्तींकडून खात्री करुन घ्यावी. या दोन्ही ठिकाणी लिकेज असण्याची शक्यता असू शकते.

३. सिलिंडरमधून वास येतोय असे वाटल्यास तो बंद करुन मोकळ्या जागेत ठेवावा. तसेच याठिकाणच्या खिडक्या, दारे त्वरीत उघडावीत. इतकेच नाही तर सिलिंडरजवळची आणि स्वयंपाकखोलीतील इलेक्ट्रीक स्विच तातडीने बंद करावेत. 

४. साधारणपणे दर ६ महिन्यांनी सिलेंडर एजन्सीचा व्यक्ती किंवा आपल्या माहितीतील व्यक्तीकडून गॅसचा रेग्युलेटर, गॅसचा पाईप आणि गॅस बर्नर म्हणजेच शेगडी तपासून घ्यावी. जेणेकरुन त्यामध्ये काही दोष असेल तर तो वेळीच दूर होईल आणि भविष्यातील अपघात टळू शकेल. 

(Image : Google)
(Image : Google)

५. आपल्या घरात किंवा आजुबाजूला गॅस सिलिंडरमुळे काही दुर्घटना घडलीच तर त्वरीत १०१ या टोल फ्री क्रमांकावर अग्निशमन दलाला फोन करावा. किंवा २३०६१११ या थेट क्रमांकावर अथवा २३०८५९९१९२/९४ या क्रमांकावर कंट्रोलरूमशी संपर्क करून आगीबाबत माहिती द्यावी. फोनवर तुमचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि जवळपासचे महत्त्वाचे ठिकाण आणि रस्त्याचे नाव सांगावे. तुमचा फोन झाल्याबरोबर पडताळणीसाठी अग्निशमन केंद्रातून उलट फोन येतो तो फोन त्वरित घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपला कॉल हा फेक कॉल होता म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. 

Web Title: Kitchen Tips: Here are 5 things to keep in mind when installing a gas cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.