वांगे, बटाटे चिरायला घेतले की शेवटचं वांगं किंवा बटाटा चिरून होईपर्यंत आधीचे सगळे काळे पडून जातात. अजिबात फ्रेश दिसत नाहीत. या भाज्यांमध्ये असणारे लोह अणि इतर काही घटक या बदलासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा आपण अशा काही भाज्या चिरतो तेव्हा हवेचा आणि त्या विशिष्ट घटकांची रासायनिक क्रिया होतो आणि त्यामुळे काही भाज्या, फळे चिरल्यानंतर काही वेळात लगेचच काळे पडायला सुरुवात होते. असं होऊ नये आणि चिरल्यानंतर काही काळ भाज्या फ्रेश रहाव्या यासाठी करून बघा हे काही अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय..
१. पाण्याचा वापर (use of water)हा उपाय बहुसंख्य घरांमध्ये केला जातो. वांगे, बटाटे, दोडके अशा भाज्या चिरल्या की त्या लगेचच स्वच्छ पाण्यात टाका. पाण्यामुळे या भाज्यांचा हवेशी कमीतकमी संपर्क येतो आणि भाज्या काळ्या होण्यापासून रोखल्या जातात.
२. लिंबू (lemon)लिंबाचा रस हा या त्रासावरचा आणखी एक चांगला उपाय. भाज्या किती आहेत त्यानुसार एका पातेल्यात पाणी टाका. त्यामध्ये एक किंवा अर्धे लिंबू पिळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यामध्ये चिरलेल्या भाज्या टाका. भाज्या अधिक काळ फ्रेश राहतील.
३. व्हिनेगर (vinegar)लिंबाप्रमाणेच व्हिनेगरही या समस्येवर एक उत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी साधारण एक लीटर पाणी असल्यास एक टेबलस्पून व्हिनेगर वापरावे. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. ज्या भाज्या आधीपासूनच चिरल्यामुळे काळ्या पडल्या आहेत, त्या भाज्या अशा सोल्युशनमध्ये टाकल्यास भाज्यांचा काळेपणा कमी होईल आणि त्या पुन्हा बऱ्यापैकी फ्रेश दिसू लागतील.