Join us  

मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झाली? वाटीभर मिठाचा सोपा उपाय; मिनिटात धार येईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 8:29 PM

Kitchen Tips: How To Sharpen Blades Of Mixer Grinder by using Salt : १० मिनिटात मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला येईल धार; फक्त..

मिक्सर ही स्वयंपाक घरातली अतिशय उपयुक्त वस्तू (Kitchen Tips). मिक्सरमध्ये अगदी काही मिनिटात साहित्याची पेस्ट होते. झटकन मिक्सर फिरवलं की सेकंदात पेस्ट तयार. पूर्वी पाटा वरवंटाचा वापर लोक करीत असे (Mixer). पण मिक्सरने पाटा वरवंट्याची जागा घेतली. मिक्सरचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण मिक्सरचं भांडं हे एकच प्रकारचे असते.

रोजच्या वापरामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कमी होतो. ज्यामुळे पदार्थ व्यवस्थितरित्या बारीक होत नाही, किंवा त्याची पेस्ट होत नाही. अशावेळी आपण नवीन मिक्सरचं भांडं विकत घेतो. पण नवीन मिक्सरचं भांडं विकत घेण्यापेक्षा आपण घरातच मिक्सर भांड्याच्या ब्लेडलाही धार लावू शकता(Kitchen Tips: How To Sharpen Blades Of Mixer Grinder by using Salt).

मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड धारदार करण्याची पद्धत

मीठ

मीठ फक्त जेवणाची चव वाढवत नसून, याच्या वापराने आपण मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला धार लावू शकता. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. एका बाऊलमध्ये फ्रेश मीठ घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात मीठ घाला.

वजन कमी करायचं? आहारातून तेल वगळावं की भात? नक्की काय खाणं बंद केल्यानं वजन घटतं?

मिक्सर ग्राइंडर मिक्सरवर लावून फिरवून घ्या. ५ ते १० मिनिटांसाठी फिरवत राहा. यामुळे ब्लेडला धार येईल. नंतर पाण्याने भांडं धुवून घ्या.

सँडपेपर

मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला धार देण्यासाठी आपण सँडपेपरचा वापर करू शकता. सँडपेपर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात १० ते २० रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याचा वापर करण्यासाठी सर्वात आधी मिक्सर ग्राइंडरमधून ब्लेड बाहेर काढा.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

नंतर सँडपेपरने घासून घ्या. सँडपेपरने घासत असताना, त्यावर पाण्याचे थेंब टाकत राहा, आणि घासत राहा. जेणेकरून ब्लेडला धार येईल. शेवटी पाण्याने मिक्सरचं भांडं धुवून घ्या. 

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल