Lokmat Sakhi >Social Viral > Kitchen Tips: भांड्यांचा साबण जास्त टिकावा म्हणून व्हायरल होतेय 'ही' ट्रिक; मिळाले कोट्यवधी व्ह्यूज!

Kitchen Tips: भांड्यांचा साबण जास्त टिकावा म्हणून व्हायरल होतेय 'ही' ट्रिक; मिळाले कोट्यवधी व्ह्यूज!

Kitchen Tips: भांड्यांच्या साबणावर हजारो रुपये वाचणार, जेव्हा साबण वापरण्याची नामी ट्रिक कामी येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 12:22 IST2025-03-17T12:18:07+5:302025-03-17T12:22:36+5:30

Kitchen Tips: भांड्यांच्या साबणावर हजारो रुपये वाचणार, जेव्हा साबण वापरण्याची नामी ट्रिक कामी येणार!

Kitchen Tips: This trick to make dish soap last longer is going viral; it has received millions of views! | Kitchen Tips: भांड्यांचा साबण जास्त टिकावा म्हणून व्हायरल होतेय 'ही' ट्रिक; मिळाले कोट्यवधी व्ह्यूज!

Kitchen Tips: भांड्यांचा साबण जास्त टिकावा म्हणून व्हायरल होतेय 'ही' ट्रिक; मिळाले कोट्यवधी व्ह्यूज!

भांड्यांच्या साबणावर गृहिणींचे हजारो रुपये दर महिन्याला खर्च होतात. महिन्याचे बजेट सांभाळायचे तर छोटे छोटे खर्च कसे मॅनेज करावेत, हा मोठा प्रश्न असतो. अशा वेळी सोशल मीडियावर व्हायरल होणारे हॅक्स कामी येतात. अशीच एक हॅक सध्या व्हायरल होत आहे ती म्हणजे भांड्यांच्या साबणाची! त्याबद्दल जाणून घेऊ. 

डिश वॉश सोपचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असूनही अनेक बायकांना साबणाने भांडी घासल्याशिवाय ती स्वच्छ झालीत असे वाटतच नाही. मात्र साबण वापरण्यासाठी त्यावर पाण्याचा मारा झाला की तो गळून जातो आणि त्याचे रूपांतर पुन्हा डिश वॉश सोप मध्ये होते. अशातच वारंवार नवीन वडी वापरायला काढणे परवडत नाही. त्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेली ट्रिक आजमावून बघण्यास हरकत नाही. 

व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार साबण ठेवण्याच्या भांड्यावर उभी आडवी चार रब्बर बँड लावून घ्यावीत आणि त्यावर भांड्यांचा साबण ठेवावा. असे केल्यामुळे साबणावर पडणारे पाणी निथळून डब्यात जाईल आणि ओला साबण कामापुरता वापरून झाल्यावर आपोआप कोरडा होईल आणि साबण संपण्याची चिंता मिटेल. एक वडी दीर्घकाळ चालेल आणि उरलेल्या साबणाच्या पाण्याचाही वापर करता येईल. 

या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटी ९९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८४ हजारांहून अधिक युजर्सनीही लाईक केले आहे. पोस्टवर १२०० हून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. ही स्वस्त आणि मस्त हॅक पुढे दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हीदेखील प्रत्यक्ष बघा. 


Web Title: Kitchen Tips: This trick to make dish soap last longer is going viral; it has received millions of views!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.