Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास-ओलावा येतो? ५ उपाय; दुर्गंधी कमी- किचन दिसेल स्वच्छ

पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास-ओलावा येतो? ५ उपाय; दुर्गंधी कमी- किचन दिसेल स्वच्छ

Kitchen Tips To Keep It Clean And Safe During The Monsoon : पावसाळ्यात किचनची कितीही स्वच्छता करा, ते ओलसर- उदास वाटतं, दुर्गंधही येतो, त्यासाठीच हे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:30 PM2023-07-28T15:30:02+5:302023-07-28T16:58:58+5:30

Kitchen Tips To Keep It Clean And Safe During The Monsoon : पावसाळ्यात किचनची कितीही स्वच्छता करा, ते ओलसर- उदास वाटतं, दुर्गंधही येतो, त्यासाठीच हे उपाय

Kitchen Tips To Keep It Clean And Safe During The Monsoon : How do you clean kitchen in monsoon | पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास-ओलावा येतो? ५ उपाय; दुर्गंधी कमी- किचन दिसेल स्वच्छ

पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास-ओलावा येतो? ५ उपाय; दुर्गंधी कमी- किचन दिसेल स्वच्छ

पावसाळ्यातही मी स्वयंपाकघर नेहमीप्रमाणे स्वच्छच ठेवते पण तरी कुबट वास येतो, चिलटं फिरतात त्यासाठी उपाय काय?

पावसाळ्याच्या  दिवसात किचनमध्ये दुर्गंधी आणि ओलसरपणा जाणवणं खूपच कॉमन आहे. कितीही आवरलं तरी किचनमध्ये ओलावा आणि  चिकटपणा राहतो. त्यामुळे घर स्वच्छ दिसत नाही.  अन्नकण पडल्यामुळे मुंग्या, झुरळंही येतात. याशिवाय मॉईश्चरमुळे खाद्यपदार्थ नरमही पडतात. अशावेळी स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी काही सोप्या किचन क्लिनिंग टिप्स फायदेशीर ठरू शकतात. (Kitchen Tips To Keep It Clean And Safe During The Monsoon)

साफसफाईसाठी लिंबाचे साल वापरा

पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भरपूर बुरशी येते आणि किचन काऊंटर, चॉपिंग बोर्ड इत्यादी स्वच्छ आणि कोरडे ठेवणे खूप कठीण होते. अशावेळी लिंबाच्या सालीचा अवश्य वापर करा. लिंबाच्या सालीवर बेकींग सोडा लावून याने सुरी, चॉपींग बोर्ड स्वच्छ करू शकता.

किटकांना दूर कसे पळवायचे

पावसाळ्याची दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे या ऋतूत कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि या किडींपासून मुक्त होण्यासाठी आपण नेहमी बाजारातून स्प्रे किंवा औषध आणतो. त्याऐवजी कडुलिंबाचे तेल किंवा लवंग तेल वापरा. कडुलिंबाचे तेल वापरत असल्यास दोन चमचे कडुलिंबाचे तेल १ लिटर पाण्यात विरघळवून घ्या आणि लवंग तेल वापरत असल्यास अर्धा चमचा अर्धा लिटर पाण्यात विरघळवा. सर्वत्र फवारणी करा आणि तुमचे काम होईल.

कच्चे तांदूळ ठेवा

पावसाळ्यात स्वयंपाकघरातील काही कोपऱ्यांमध्ये ओलसरपणा अनेकदा वाढतो. त्यामुळे स्वयंपाकघरातून वास येऊ लागतो. अशावेळी स्वयंपाकघरातील ओलसरपणा दूर ठेवण्यासाठी पावसाळ्यात कच्चा तांदूळ वापरणं उत्तम ठरतं. यासाठी काही कच्चे तांदूळ कॉटनच्या  कपड्यात बांधून ओलसर जागी ठेवा आणि दर 15 दिवसांनी तांदूळ बदलत राहा.

लादी पुसताना हे लक्षात ठेवा

लादी पुसताना कपडा पूर्ण कोरडा असावा.  जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर पहिल्यांदा ओलसर कापडानं फरशी पुसा नंतर स्वच्छ पिळून थोड्या कोरड्या कापडानं लादी पुसा. लादी पुसताना पाण्यात फिनाईल मिसळा. जेणेकरून डास आणि दुर्गंधी लांब राहील.

खाद्यपदार्थ व्यवस्थित ठेवा

पापड, चिप्स, चिवडा असे स्नॅक्स पावसाळ्यात ओलाव्यामुळे नरम पडतात आणि खाण्यायोग्य राहत नाहीत. यासाठी त्यांना प्लास्टिकच्या पाऊचमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी काही मिनिटे आधी बाहेर काढा.

Web Title: Kitchen Tips To Keep It Clean And Safe During The Monsoon : How do you clean kitchen in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.