Lokmat Sakhi >Social Viral > सकाळी घाईघाई स्वयंपाक करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, कमी वेळात होईल चविष्ट स्वयंपाक

सकाळी घाईघाई स्वयंपाक करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, कमी वेळात होईल चविष्ट स्वयंपाक

Kitchen tips to save cooking time in kitchen : स्वयंपाक झटपट होण्यासाठी फायदेशीर ठरतील अशा टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 01:58 PM2023-12-12T13:58:52+5:302023-12-12T14:00:58+5:30

Kitchen tips to save cooking time in kitchen : स्वयंपाक झटपट होण्यासाठी फायदेशीर ठरतील अशा टिप्स...

Kitchen tips to save cooking time in kitchen : Remember 3 things while cooking in a hurry in the morning, tasty cooking will be done in less time | सकाळी घाईघाई स्वयंपाक करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, कमी वेळात होईल चविष्ट स्वयंपाक

सकाळी घाईघाई स्वयंपाक करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, कमी वेळात होईल चविष्ट स्वयंपाक

स्वयंपाकाचं काम झटपट व्हावं आणि आपण आवरुन वेळेत आपण किचनच्या बाहेर पडावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. यामुळे आपल्याच हाताशी इतर काही गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ शिल्लक राहणार असतो. पण लहान सहान कामं आणि रोजची साफसफाई किंवा स्वयंपाक यात आपला खूप वेळ जातो. आणि कितीही ठरवलं तरी ही सगळी कामं करता करता वेळेचं गणित चुकतंच. इतकी सगळी कामं करुन नकळत आपण थकूनही जातोच. पण स्वयंपाकाच्या बाबतीत किंवा किचनमध्ये वापरायच्या काही सोप्या हॅक्स आपल्याला माहित असतील तर आपला बराच वेळ वाचू शकतो. या हॅक्स वापरल्याने आपलं नेहमीचंच काम काही प्रमाणात सोपं होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा हॅक्स स्वयंपाक करताना नक्कीच कामी येतात. पाहूयात अशाच काही सोप्या हॅक्स (Kitchen tips to save cooking time in kitchen)...

१. कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर

कुकरमध्ये भात, वरण किंवा आणखी काही शिजवताना अनेकदा शिट्टीच्या आसपास पाणी बाहेर येते. अशावेळी गॅस, कुकर, ओटा सगळंच खराब होतं. पण असं पाणी बाहेर येऊ नये यासाठी शिजवत असलेल्या पदार्थामध्ये १ चमचा तूप, तेल किंवा चक्क स्टीलचा १ चमचा घालावा. यामुळे पाणी बाहेर येत नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

२. भाजीतील किड काढण्यासाठी 

कोबी, फ्लॉवर किंवा पालेभाजीमध्ये बऱ्याचदा अळ्या, किडे, जंतू असण्याची शक्यता असते. त्या नीट साफ करणे आवश्यक असते. मात्र साध्या पाण्याने भाज्या धुतल्यास हे निघून जाईलच असे सांगता येत नाही. अशावेळी पाण्यात हळद आणि मीठ घालून त्यात या भाज्या भिजवून ठेवाव्यात. हे दोन्ही घटक निर्जंतूकीकरणासाठी अतिशय चांगले असल्याने भाजीपाल्यातील किड सहज निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. पराठा फुटू नये तर

पोळीचा कंटाळा आला की आपण भाज्या घालून पराठे करतो. दुधी भोपळा, मुळा, बटाटा. पनीर यांचे पराठे करताना ते फुटण्याची शक्यता असते. पण पराठा फुटू नये यासाठी भाजी किंवा पनीरचे मिश्रण तयार करताना त्यात मीठ घालू नये. सगळ्यात शेवटी स्टफींग पोळीच्या आवरणात भरताना मीठ घालावे म्हणजे या पीठाला पाणी सुटत नाही. तसेच कणीक घट्टसर भिजवावी. 


 

Web Title: Kitchen tips to save cooking time in kitchen : Remember 3 things while cooking in a hurry in the morning, tasty cooking will be done in less time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.