Lokmat Sakhi >Social Viral > नॉन स्टीक पॅनचे कोटींग खराब होऊ नये म्हणून करा फक्त ७ गोष्टी; पंकज भदौरीया सांगतात...

नॉन स्टीक पॅनचे कोटींग खराब होऊ नये म्हणून करा फक्त ७ गोष्टी; पंकज भदौरीया सांगतात...

Know How to Clean a Non-Stick Pan by master Chef Pankaj Bhadauria : पातळ झालेल्या किंवा कोटींग गेलेल्या या तव्यावर डोसा किंवा धिरडे चिकटायला लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 09:33 AM2023-11-01T09:33:19+5:302023-11-01T09:35:01+5:30

Know How to Clean a Non-Stick Pan by master Chef Pankaj Bhadauria : पातळ झालेल्या किंवा कोटींग गेलेल्या या तव्यावर डोसा किंवा धिरडे चिकटायला लागतात.

Know How to Clean a Non-Stick Pan by master Chef Pankaj Bhadauria : Do only 7 things to prevent the coating of non stick pan from getting damaged; Pankaj Bhadauria says... | नॉन स्टीक पॅनचे कोटींग खराब होऊ नये म्हणून करा फक्त ७ गोष्टी; पंकज भदौरीया सांगतात...

नॉन स्टीक पॅनचे कोटींग खराब होऊ नये म्हणून करा फक्त ७ गोष्टी; पंकज भदौरीया सांगतात...

नॉन स्टीक तवा किंवा पॅन ही आपल्या स्वयंपाक घरातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. डोसा, धिरडे करण्यासाठी किंवा झटपट एखादा पदार्थ करण्यासाठी या तव्याचा घरोघरी वापर केला जातो. पण भरपूर पैसे देऊन आणलेली हे नॉन स्टीक तवा किंवा पॅन काही दिवसांत खराब होतात आणि त्याच्यावर बाजुने तेलाचे थर जमा व्हायला लागतात. इतकेच नाही तर काही दिवसांतच या तव्याचे कोटींग निघते आणि तो खराब होते. पातळ झालेल्या किंवा कोटींग गेलेल्या या तव्यावर डोसा किंवा धिरडे चिकटायला लागतात. मग ऐनवेळी असे झाले की आपला सगळा मूडच जातो. मात्र असे होऊ नये आणि दिर्घकाळ हा नॉन स्टीक पॅन आहे तसा चांगला राहावा यासाठी तवा वापरताना आणि घासताना काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. यासाठी काय करायचं याविषयी काही सोप्या टिप्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याशी याविषयीच्याच काही महत्त्वाच्या टिप्स इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करतात. पंकज के नुस्खे यामध्ये तवा साफ करण्यासाठी कोणत्या टिप्स सांगतात ते पाहूया (Know How to Clean a Non-Stick Pan by master Chef Pankaj Bhadauria)...

१. तव्याचा वापर करुन झाल्यावर तो गरम असतानाच त्यामध्ये पाणी आणि लिक्विड सोप घालून ५ ते ७ मिनीटे हे चांगले भिजवायचे आणि मग तवा हलक्या हाताने धुवायचा. 

(Image : Google )
(Image : Google )

२. तव्यावरुन धिरडे किंवा डोसा काढताना सिलिकॉनच्या किंवा लाकडाच्या उलथन्याचाच वापर करायचा. 

३. नॉन स्टीक पॅनमध्ये खूप मोठ्या गॅसवर काहीही करु नका. नॉन स्टीक वापरताना गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवा म्हणजे हा तवा खराब होणार नाही. 

४. पॅन गरम असताना तो धुवू नका, कारण त्यामुळे त्याचा वरचा थर खराब होण्याची शक्यता असते. तवा पूर्ण गार होऊद्या आणि मगच धुवा. 

५. नॉन स्टीक घासण्यासाठी माईल्स लिक्विड सोप आणि स्पंज पुरेसा असतो. कोमट पाण्यात लिक्विड सोप घालून मग स्पंजने हलक्या हाताने हा तवा किंवा पॅन घासल्यास तो सहज स्वच्छ होतो.  तारेची घासणी तव्याला अजिबात लावू नका, त्यामुळे तव्याचे कोटींग खराब होते.

६. तवा धुवून झाल्यानंतर तो ठेवताना त्याला न विसरता २ थेंब तेल लावून ठेवा. त्यामुळे हा तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते. 

७. काही वेळा या तव्याला तेलाचे किंवा अन्य कोणते थर जमा होतात आणि ते साचत जातात. अशावेळी बेकींग सोडा आणि पाणी एकत्र करुन हा तवा स्पंजने साफ करावा. त्यामुळे हे थर निघून जाण्यास मदत होते. 

Web Title: Know How to Clean a Non-Stick Pan by master Chef Pankaj Bhadauria : Do only 7 things to prevent the coating of non stick pan from getting damaged; Pankaj Bhadauria says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.