Join us  

कढई, पातेल्यावरचे कळकट्ट डाग झटपट काढण्याची सोपी ट्रिक, भांडी चमकतील नव्यासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2024 12:55 PM

Know how to clean dirty pots easily cleaning tips : खराब झालेली भांडी छान स्वच्छ होण्यासाठी सोपा उपाय...

आपण स्वयंपाकासाठी कढई, पातेली आणि इतरही अनेक भांडी वापरत असतो. कधी कढईत काही तळले किंवा एखादा पदार्थ भांड्याला खाली लागला तर ती भांडी पटकन खराब होतात. बरेचदा भांड्यांना बाहेरुनही काळे डाग पडतात. हे डाग भांड्यांना जास्त चिकटले असतील तर नुसते घासणीने घासून जात नाहीत त्यामुळे ते घासण्यासाठी खूप जोर द्यावा लागतो. अनेकदा महागडा लिक्विड सोप किंवा साबण वापरुनही हे मेंचट डाग निघतातच असे नाही. तर या भांड्यांवरचे किंवा कढईवरचे काळे डाग तसेच राहतात. मग असे डाग राहीलेली भांडी एकतर खूप खराब दिसतात. तसेच हीच भांडी पुन्हा पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे ही खराब झालेली भांडी छान स्वच्छ होण्यासाठी आणि चकचकीत दिसण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया (Know how to clean dirty pots easily cleaning tips)...

१. एका बाऊलमध्ये लिक्विड सोप घ्यायचा. 

२. त्यामध्ये अंदाजे बेकींग सोडा घालायचा. 

(Image : Google)

३. यामध्ये कोकाकोला घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

४. सोडा आणि कोकाकोला एकत्र केल्याने या मिश्रणाचा थोडा फेस तयार होतो. 

५. हे मिश्रण भांड्यावर काळपट किंवा चिकट झालेल्या भागावर लावावे. 

६. नंतर घासणीने भांडी स्वच्छ घासावीत. 

७. मग पाण्याने भांडी धुतल्यानंतर ती एकदम नव्यासारखी चमकतात. 

८. बेकींग सोडा आणि कोकाकोला यामध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे भांड्यांवर चढलेला राप सहज निघून जाण्यास मदत होते.    

  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स